सरपंच अपात्र.. फटाके व मासिक सभा

सत्तेचा अहंकार पूर्णपणे अंगात भिणल्यामुळे मी म्हणेन ती पूर्व दिशा अश्या विचाराने गेले चार वर्ष सरपंच म्हणून काम करत असलेल्या व्यक्तीकडून दुसरी अपेक्षा करणे चुकीचे आहे.त्यांना अपात्र मा.जिल्हाधिकारी यांनी उपलब्ध असलेल्या कागदपत्र आणि पुरावे यावरून केले आहे.तर या सरपंच आपल्या पत्रकात जिल्हाधिकारी यांचे मदतीने हा निर्णय झाला असा आरोप जिल्हाधिकारी यांचेवरच करतात.ज्या सरपंच शिवसेनेच्या पदाधिकारी आहेत नेहमी वर्तमानपत्र टीव्ही सरख्या इतर सोशल मीडिया वर ॲक्टिव असणाऱ्या व्यक्तीला त्यांच्याच पक्षाचे सरकार असताना चुकीच्या पद्धतीने अपात्र करू शकतात का?केवढा हास्यास्पद खुलासा यांनी केला आहे.
याचा कहर म्हणजे त्यांना आणि ग्रामसेवक यांना मा.जिल्हाधिकारी यांनी सरपंच आणि सदस्य म्हणून अपात्र झाल्याचे लेखी पत्र प्राप्त झाल्यानंतर  देखील ग्रामपंचायत मध्ये  आज तारीख १२ रोजी ११ वाजता ग्राम पंचायत ची मासिक सभा घेतली(अपात्र झाल्या चां लेखी आदेश प्राप्त झाल्यावर)हा मा.जिल्हाधिकारी सो.यांचा निर्णयाचा अपमान केला आहे.या बाबत सचिव (ग्रामसेवक श्री .रोशन जाधव)यांना विचारणा केली असता त्यांनी देखील त्या सभेचा अध्यक्ष आहेत असे बेजबादार  उत्तर दिले .आणि बैठक सुरू ठेवली.
या बाबत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे तत्काळ ग्रामसेवक यांचे विरुद्ध तक्रार दाखल करणार आहोत.सतेचा दुरुपयोग करून कदाचित त्या पुढील न्यायालयीन लढाई लढतील देखील कारण सत्ता पैसा या बाबत त्या खूप पुढे आहेत.परंतु त्यांना अपात्र केल्याच्या निर्णयाचे मात्र ग्रामस्थांनी फटाके फोडून आणि एकमेकांना पेढा भारावून आनंद व्यक्त केला याचे निश्चित समाधान आम्हाला आहे.
विक्रांत मधुकर गांधी
दिलीप विठ्ठल मयेकर
सुभाष धोंडू सलीम
राजेश रघुनाथ हळदणकर

Comments