राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी शहरातील युवा नेते साहिल पठाण आणि तनवीर मुजावर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे बाजारपेठेतील नळ कनेक्शन लावण्यात आले; जनतेकडून समाधान आणि कौतुकाचा वर्षाव

रत्नागिरी प्रतिनिधी:-
रत्नागिरी नगर परिषदेच्या मनमानी कारभाराची बाजारपेठेतील स्थानीक जनतेकडून पोल खोल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. नगर परिषदेच्या चाललेल्या नियोजन शुन्य कारभाराचे राष्ट्रवादी काँग्रसचे साहिल पठाण यांनी अक्षरशः वाभाडे काढले. बिल आणि अर्ज असूनही नवीन नळपाणी योजनेचे कनेक्शन बसवून देणार नाही असे म्हटल्यावर तनवीर मुजावर आणि साहिल पठाण यांनी आक्रमक पवित्रा घेऊन का बसवणार नाही असे स्थानीक नगरसेवकाला जाब विचारला. सर्व नियम धाब्यावर बसवून बाजारपेठेमध्ये भरदिवसा खोदकाम करून नवीन नळपाणी योजनेचे काम सुरू झाले. यावेळी फहिम मुजावर, शैजाद एब्जी, असद झारी, एजहर झारी, मुजम्मिल पडवेकर हे स्थानिक जागरूक नागरिक तसेच बहुसंख्य महिला वर्ग उपस्थित होता. सदरची सविस्तर माहीती साहिल पठाण यांनी दिली आहे.

Comments