प्रधानमंत्री आवास योजना ड यादीतील लाभार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत धोरणामध्ये बदल करण्यात यावा: रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
प्रधानमंत्री आवास योजना ड यादीतील लाभार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत धोरणामध्ये बदल करण्यात यावा अशी मागणी रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ब यादीतील कामे सुरू आहेत. ड यादीत सर्वसाधारण सह मागासवर्गीय देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे सदर ड यादीतील लाभार्थ्यांकडून घरकुल मंजूरी बाबत सतत विचारणा होत असते. मात्र या यादीतील घरकुलांना अद्याप मंजुरी मिळाली नाही त्यामुळे लाभार्थी देखील चिंतेत सापडले आहेत. निवा-याचा प्रश्न उद्भवू नये म्हणून ड यादीतील लाभार्थ्यांपैकी काही लाभार्थ्यांनी कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून नवीन घर बांधून घेतले आहे. मात्र अशा लाभार्थ्यांना शासन निर्देशाप्रमाणे ड यादीतून कमी करण्यात आले आहे. अनेकांनी उधार उसनवारी करून घरे बांधली आहेत मात्र शासन याचा विचार न करता त्यांना सदरच्या यादीतून काढून टाकले जात आहे व लाभापासून वंचित ठेवले जात आहे. हा एक प्रकारचा अन्यायच आहे. त्यामुळे शासनाने धोरणामध्ये बदल करणे गरजेचे आहे अशी मागणी केलेले पत्र रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.
Comments
Post a Comment