दिव्यांगांसाठी कार्यशाळा संपन्न "*


*संविधान दिनानिमित्त आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी व विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्या कडून दिव्यांगांसाठी कार्यशाळा संपन्न "*
दिनांक 26 नोव्हेंबर संविधान दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण  व आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी  यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिव्यांग व्यक्तींकरिता विधी सेवा योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी, मोटार वाहन अधिनियम 1988 अंतर्गत दिव्यांगांसाठी असलेल्या सेवा, सुविधांबाबत मार्गदर्शन करणे तसेच दिव्यांग हक्क अधिनियम 2016 अंतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून दिव्यांगाना देण्यात येणाऱ्या वाहन परवाना फिटनेस प्रमाणपत्र  काढण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक 26/11/2021 रोजी सकाळी 11 वाजता अल्पबचत सभागृह, येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाट्न दीप प्रज्वलन करून रत्नागिरी विधी सेवा समितीचे सचिव मा. श्री. आनंद सामंत व उप विभागीय परिवहन अधिकारी रत्नागिरी मा. श्री. सुबोध मेडशीकर यांच्या हस्ते संपन्न झाले. दिव्यांगांना  वाहन परवाना मिळविताना जिल्हा शासकीय रुग्णालया कडून राबविण्यात येणाऱ्या प्रक्रिया व दिव्यांगांच्या शंकांचे निरसन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले व डॉ. अमित वायंगणकर यांनी केले. उप  प्रादेशिक कार्यालया रत्नागिरी द्वारा देण्यात येणाऱ्या वाहन परवाना तरतुदी व प्रक्रिया बाबत श्री. मेडशीकर साहेब यांनी ppt द्वारे सादरीकरण केले व दिव्यांगांनी तसेच आस्थाने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. मा. जिल्हाधिकारी यांनी संविधान दिनाच्या निमित्ताने दिव्यांगांना उपारोक्त कायद्याने देण्यात आलेले अधिकार प्रदान करण्यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक ती सर्व कार्यवाही करेल असे सांगितले मा. सभापती समाज कल्याण श्री. परशुराम कदम यांनी अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन केल्या बद्दल आस्था व विधि सेवा प्राधिकरणचे अभिनंदन केले व संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोप करताना मा. आनंद सामंत यांनी दिव्यांगांसाठी विधी सेवा प्राधिकरण मार्फत दिव्यांगांसाठी देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची माहिती देत संविधान प्रास्ताविकेचे वाचन सर्वांकडून करून घेत सर्वांनी संविधानातील मूल्य जोपासने हे आपले कर्तव्य मानले पाहिजे असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन तसेच दिव्यांगांचे प्रश्न मांडण्याचे काम आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरीच्या सचिव श्रीम. सुरेखा पाथरे यांनी केले, मूकबधिर दिव्यांगांकरिता साइन लँगवेज इंटरप्रिटर चे काम कै.के.पी. अभ्यंकर मूकबधीर शाळेच्या श्रीम. मुळे यांनी केले.  या कार्यक्रमास मान्यता प्राप्त कार मॉडिफिकेशन करणारे श्री. राजाराम घाग, जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी कार्यरत संस्थांचे पदाधिकारी व दिव्यांग उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी   संपदा कांबळे, कल्पेश साखरकर,अनुष्का आग्रे,  शिल्पा गोठणकर, शबनम तहसीलदार यांनी परिश्रम घेतले.

Comments