राजापूर तहसिल कार्यालयातून माहीती अधिकारातून माहिती का मिळत नाही: समीर शिरवडकर

राजापूर तहसिल कार्यलयात माहिती अधिकार बाबत  वानवा प्रत्येक वेळी दिसून आली आहे. सदर, कार्यालयात जन माहिती अधिकारी पद आहे का नाही हेच समजत नाही याची प्रचिती आज पुन्हा दिसून आली असल्याची माहीती समीर शिरवडकर यान्नी दिली आहे. माहीती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य सचिव समिर विजय शिरवडकर यांनी काही दि.०४/०२/२१ रोजी महिती अधिकार या कार्यलयात दाखल केला होता. परंतु वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करून माहिती आज मिळेल उद्या मिळेल या आशेवर ठेऊन आज तागायत माहिती उपलब्ध झालीच नाही. तदनंतर समीर शिरवडकर यांनी एका बैठकीत सुद्धा सदर बाब तहसीलदार सौ.शीतल जाधव यांच्या निदर्शनास आणून दिली होती. तहसीलदार शितल जाधव यांनी संबंधितांना आदेश देऊनही आज तागायत जन माहिती अधिकारी यांनी माहिती पुरवली नाही. याचाच अर्थ जन माहिती अधिकरी पद आहे का नाही असा प्रश्न निर्माण होतो. की त्यांना माहिती अधिकार प्रशिक्षणाची गरज आहे का असाही प्रश्न निर्माण होतो. तसेच दुसरा माहिती अधिकार अर्ज दि.१२/१०/२०२१ महानेट बाबत दाखल केला होता. मात्र त्याबाबतही आज तागायत माहिती उपलब्ध झालेली नाही. याचा अर्थ असा होतो की सक्षम जन माहिती अधिकारी आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो. याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करणार असल्याचे माहुती अधिकार कार्यकर्ते महासंघ महाराष्ट्र राज्यचे सचिव समिर शिरवडकर यांनी यावेळी सांगितले.

Comments