जयगडच्या मच्छिमारांना नाही कुणी वाली....जिंदाल कंपनीच्या जहाजाने ठोकर देऊन नवेद नौकेचा अपघात झाला?जयगड पोलिस नेमका कशा पद्धतीने तपास करीत आहेत?
रत्नागिरी तालुक्यातील जयगड परिसरातील मच्छीमारांना आता कुणी वाली नाही का असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. नवेद मच्छिमार नौका मच्छीमारीसाठी गेली होती मात्र ती परत आली नाही. त्या नौकेतील एका खलाशाचे प्रेत सापडले. या सर्व प्रकरणांमध्ये जयगड चे पोलीस नेमके कशा पद्धतीने तपास करत आहेत असा सवाल उपस्थित केला जात आहे. या नौके मध्ये पाच खलाशी व दोन तांडेल एकूण सात लोक होते. त्यापैकी एकाचे प्रेत आढळून आले. त्यामुळे जयगड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकारास संदर्भात जयगड परिसरातील ग्रामस्थांची शुक्रवारी बैठक देखील पार पडली. मच्छीमारी नौकेचे मालक नासिर हुसैनमियाँ संसारे यांनी आपला तक्रार अर्ज जयगड पोलिस स्थानकात सादर केला आहे. या तक्रार अर्जात असे म्हटले आहे की जिंदाल कंपनीच्या जहाजाने माझ्या नौकेला ठोकर देऊन अपघात झाल्याचे समजते. तरी सदर घटनेबाबत तपास करुन योग्य तो न्याय मिळावा अशी विनंती या तक्रार अर्जात केली आहे. ग्रामस्थांचा ज्या कंपनीवर संशय आहे ती कंपनी जिंदाल कंपनीच आहे का? असे असेल तर सदर जिंदाल कंपनीच्या जहाजाचा तपास पोलिस यंत्रणेकडून होतोय का? जी.पी.एस. यंत्रणेमध्ये काय आढळून आले आहे. यासंदर्भात पोलिस ग्रामस्थांना सविस्तर माहीती देतील का असे सवाल उपस्थीत केले जात आहेत. शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. खलाशी, तांडेल यांचे नेमके काय झाले. ती मच्छीमारी नौका नेमकी गेली कुठे?, सध्या त्या नौकेचे काय झाले आहे?, त्या नौकेतील खलाशी, तांडेल यांचा बुडून मृत्यू झाला आहे का? असेही सवाल उपस्थित केले जात आहे. साखरी आगर जयगड भागात कार्यरत असलेले बीट अंमलदार देखील कशा पद्धतीने तपास करित आहेत याबाबतदेखील सवाल उपस्थित केले जात आहेत. ज्या कंपनीच्या जहाजाची टक्कर लागून मासेमारी नवेद नौकेचा अपघात झाला आहे. त्या बोटीमधील खलाशांचे आता यापुढे प्रेत आढळून आले तर ते प्रेत त्या कंपनीच्या गेटवर नेऊन ठेवले जाईल असाच पवित्रा आता या भागातील ग्रामस्थांनी घेतला आहे.
Comments
Post a Comment