रत्नागिरीत अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

अण्णा हजारे यांचे विचार गांधी विचारला धरून आहेत शेजारी कुणी ऊभा राहिला म्हणून बदलू शकत नाहीत असे परखड सूतोवाच अण्णा हजारे भ्रष्टाचाराविरुद्ध  न्यासचे कोंकण विभाग संघटक अल्लाउद्दीन शेख यांनी समिती सभेत बोलतांना व्यक्त केले.
रत्नागिरी शासकीय विश्रामगृह येथे रविवारी अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासची सभा झाली. सभेचे आयोजन न्यासचे जिल्हा अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी केले.
या सभेला भाकर संस्थेचे देवेंद्र पाटील, ज्येष्ठ पत्रकार यासीन पटेल, रंजना कदम, रेवा कदम, वीणा खातू, शेखर दळी, गणपत वारगडा, अॅड.सरताज कापडी, रमजान गोलंदाज, धनाजी भांगे, विद्येश नागले आदी उपस्थित होते. 

Comments