गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये नवमतदारांना मतदान कार्ड प्रदान करून संविधान दिन साजरा

रत्नागिरी प्रतिनिधी:-
रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये संविधान दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यानी नेतृत्व करून 18 वर्षे पूर्ण झालेल्या 75 विद्यार्थ्यांना मतदान कार्ड  प्रदान करण्यात आले. फाउंडेशन कोर्सच्या माध्यमातून डॉ.आनंद आंबेकर यांनी नेतृत्व कौशल्य विकसित करण्याच्या प्रकल्पातून वैभवी गवळी,साक्षी  सागवेकर ,यश लिमये,तन्वी पात्याणे,अपूर्वा पावसकर या द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासमधील आणि आपल्या परिसरातील 18 पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची  ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने कागदपत्रे जमा करून मतदान कार्डचे काम पूर्ण केले. कोरोना काळात 75 विद्यार्थ्यांचा सतत पाठपुरावा करून काम करताना खूप सहनशीलता ठेवावी लागली असे नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये विचार मांडले.
    महाविद्यालयाचे  प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे विचार प्रकट केले की , महाविद्यालय काळात विद्यार्थ्यांनी नेतृत्व कला आत्मसात केली तरच समाजासाठी भविष्यात प्रतिभावंत राजकिय आणि सामाजिक नेतृत्व मिळू शकते, सदर शैक्षणिक प्रकल्पाचे कौतुक करताना मार्गदर्शक डॉ. आनंद आंबेकर यांना शुभेच्छा दिल्या, तसेच सदर प्रकल्पाला सहकार्य आणि प्रोत्साहन देणारे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ.मकरंद साखळकर, उपप्राचार्य डॉ.यास्मिन आवटे ,वाणिज्य विभागप्रमुख सीमा कदम यांचे अभिनंदन केले.

Comments