रत्नागिरीचे दीपक राऊत यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलच्या उपाध्यक्षपदी निवड
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष भानुदास माळी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांची निवड केली. रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस दीपक राऊत यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे उपाध्यक्ष म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. रत्नागिरी जिल्हा काँग्रेसमध्ये महत्वाची जबाबदारी पार पाडणारे दीपक राऊत यांची अभिनंदनीय निवड झाली आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी म्हणून सातत्याने जनतेशी नाळ असणाऱ्या दीपक राऊत यांची निवड अतिशय महत्वाची आहे. जिल्हा काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याची अशा प्रकारे वरिष्ठ संघटनात्मक कामकाजासाठी निवड होण्यामुळे जिल्ह्यामध्ये ओबीसीमध्ये एक चांगल्या प्रकारचे वातावरण निर्माण होईल. या वातावरणाचा जिल्हा काँग्रेसच्या वाटचालीत महत्त्वाचा टप्पा ठरेल. संपूर्ण देशभर ओबीसींची चळवळ सुरू आहे. ओबीसींचे हक्क व अधिकार ओबीसी मिळणारे प्रतिनिधित्व यासाठी सुरू असलेली चळवळ, ओबीसीची जातिनिहाय जनगणना अशा महत्त्वाच्या विषयांवर संपूर्ण जिल्हाभर कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांची झालेली निवड आशादायी वातावरण निर्माण करण्यास उपयोगी ठरेल. अशा प्रसंगी जिल्ह्यातून एका उमद्या नेतृत्वाला प्रदेश पातळीवर संधी मिळणं ही विशेष बाब आहे. ओबीसींच्या प्रश्नाची जाण असणारा असा हा पदाधिकारी प्रदेश काँग्रेसमध्ये आपल्या कामाने छाप पडेल त्यांचे वक्तृत्व व कर्तुत्व या जोरावर महाराष्ट्र मध्ये काँग्रेसच्या ओबीसी सेलची चांगली पकड घडविण्यात त्यांनी मोलाची कामगिरी पार पाडतील. जिल्हा काँग्रेस त्यांचं अभिनंदन करत आहे.
Comments
Post a Comment