राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पग्रस्तांना पूर्वी ठरल्याप्रमाणेच भरपाई द्या: शौकत मुकादम
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग व गुहागर-विजापूर महामार्गाचे काम गेले दहा वर्ष अतिशय संथगतीने सुरु झाले आहे. हे दोन्ही महामार्ग अतिशय खडतर असून त्यांचे काम अनेक वर्षे रखडले आहे.या प्रकल्पासाठी केंद्र शासनाने पूर्वी जो दर ठरविला आहे त्याच दराने भरपाई द्यावी.नवीन शासननिर्णयाप्रमाणे जर भरपाई देण्याचा प्रयत्न झाला तर ती शेतकन्यांशी प्रतारणा व विश्वासघात ठरेल.कारण जमिनी संपादित करताना जो केंद्र सरकारने जो दर सांगितला होता त्यापेक्षा नवीन दर कमी आहे. हा शेतकऱ्यांना मान्य नाही कारण कोकणातील शेतकऱ्यांची मुळात अल्पशी गुंठेवारी शेती असते तीच प्रकल्पात गेली तर त्या शेतकऱ्याचे संपूर्ण जीवनच अंधारात जाते याचा विचार होणे गरजेचे आहे अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही. हे सर्व प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरतील असा इशारा राष्ट्रवादीचे नेते सामाजिक कार्यकर्ते शौकतभाई मुकादम यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment