शिवसेना प्रणित शिव सामर्थ सेनाच्या पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर

शिवसेना प्रणित शिव सामर्थ सेनाच्या पदाधिकाऱ्यांची  नावे जाहीर 

मुंबई (शांताराम गुडेकर)
            हिंदू हृदयसम्राट,सरसेनापती मा.श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने,पक्षप्रमुख,महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव साहेब ठाकरे, व युवासेना अध्यक्ष,पर्यावरण मंत्री मा.श्री.आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना सचिव, खासदार मा.श्री.विनायकजी राऊत यांच्या मार्गदर्शनाने संघटनेच्या घाटकोपर कार्यालयात मुंबई,सातारा,ठाणे जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या त्यात सातारा उपजिल्हा अध्यक्षपदी श्री.प्रकाश सोपान पाटील,महिला जिल्हा अध्यक्षपदी सुलोचना चंद्रकांत पवार,पुणे महिला जिल्हा अध्यक्षपदी अनन्या गणपत दीक्षित,कराड दक्षिण तालुका अध्यक्षपदी विजय भिवराम पाटील,पाटण तालुका अध्यक्ष पदी गौरव महादेव खराडे,सातारा तालुका अध्यक्ष पदी राहुल संपत इंगवले,ठाणे महिला तालुका अध्यक्षपदी सौ.अमृता विलास पवार,मुंबई मीडिया उपाध्यक्षपदी ऋषिकेश किशोर महाजन,मुंबई आग्रिपाडा विभाग अध्यक्षपदी उद्धव राजाराम झगडे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. तसेच मुंबई कुर्ला येथील नवनिर्वाचित शिवसेना उपशाखाप्रमुख शाखा क्र.167 आविष्कार वांगडे,शाखा क्र.167 राहुल गुप्ता यांचा शिव सामर्थ्य सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी शिव सामर्थ्य सेनेचे अध्यक्ष श्री.संदीप भोज,सरचिटणीस जितेंद्र दगडू सकपाळ,कोषाध्यक्ष मनोज घोडेस्वार,मुंबई सरचिटणीस अमोल वंजारे,मुंबई चिटणीस पूजा दळवी, ईशान्य मुंबई अध्यक्ष हितेश गायकवाड, आग्रीपाडा शिवसेना उपशाखाप्रमुखं राजाभाऊ झगडे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments