नाटे पोलिस प्रशासन संतोष गावकर यांचा शोध घेत आहे का? आम्हाला आमचा भाऊ मिळवून द्या: अनिल गावकर यांचे जिल्हा पोलिस अधिक्षकांना पत्र
सत्तर दिवस उलटूनही राजापूरातील अणसुरे येथील संतोष गावकर यांचा पत्ता पोलिस प्रशासनाला का सापडत नाही असा सवाल त्यांच्या नातेवाईकांनीच उपस्थित केला आहे. पोलिस स्थानकात जाऊन जाऊन पायताण झिजत आले. अनेक वेळा पाठपुरावा केला. गावोगावी शोध घेतला. अनेकांना माहीती दिली. अनेकांना निरोपही दिले. मात्र बेपत्ता झालेल्या संतोष गावकर यांचा पत्ता काही सापडत नाही. पोलिस प्रशासन नेमके कोणत्या पद्धतीने तपास करित आहेत. जिल्हा पोलिस अधिक्षक काही आढावा घेत आहेत का? असे सवाल आता उपस्थित होऊ लागले आहेत. राजापूर तालुक्यातील अणसुरे ग्रामपंचायत सदस्य, कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संतोष गावकर सत्तर दिवस उलटून गेले तरी अजुन सापडत नसल्याने संतोष गावकर यांचे कुटुंबिय चिंतेत सापडले आहेत. संतोष गावकर यांचे भाऊ अनिल गावकर यांनी संतोष गावकर ४ सप्टेंबर पासून बेपत्ता असल्याबाबत नाटे पोलिस स्थानकात तक्रार दिली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडेही निवेदन सादर केले आहे. मात्र अद्याप संतोष गावकर ही व्यक्ती सापडत नाहिये. त्यामुळे आता जिल्हा स्तरावरुनच जिल्हा पोलिस अधिक्षक मोहित कुमार गर्ग यांनीच आता जातिनिशी लक्ष घालून संतोष गावकर यांचा शोध घ्यावा आणि आम्हाला आमचा भाऊ परत आम्हाला मिळवून द्यावा अशी विनंती अनिल गावकर यांनी केली आहे.
Comments
Post a Comment