रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे सांडमवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार
रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे सांडमवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. यामुळे येथील शेतकरी राकेश दशरथ पंगेरकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवार आंबेरे या भागात बिबट्या वाघ भर वस्तित येत असून गायी, बैल, म्हैशी यांच्यावर हल्ले करत आहे. त्यामुळे या भागात भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच एक गाय बिबट्या वाघाची शिकार बनली होती. अशा घटना या भागात सतत घडत असल्याचे ग्रामास्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे वन विभागाने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment