अल्ट्राटेक सिमेंटचे रत्नागिरी येथील कार्यालय सील करण्याचे तहसीलदारांचे आदेश


दै फ्रेश न्यूज (वृत्तसंस्था)- रत्नागिरी तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट या कंपनीला मिऱ्या येथील जमीन महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांनी भाडेपट्ट्यानी दिली आहे. सदर जमिनीचा कंपनी औद्योगिक वापर करत असल्याने आणि वापरास कोणतीही पूर्व परवानगी घेतली नसल्याने तहसीलदार रत्नागिरी यांनी याबाबत कंपनीस नोटीस देऊन खुलासा मागवला, सदर खुलासा समाधानकारक नसल्याने सन 1981 पासून अनधिकृत बिनशेती वापर करीत असल्याने कंपनीस रक्कम रुपये  8,55,685/- इतका दंडाचा आदेश करण्यात आला आहे. 
सदर दंड भरणेबाबत कंपनीस दोन नोटीसा देण्यात आलेल्या होत्या, तथापि आज अखेर कंपनी दंडाची रक्कम भरलेली नाही. कंपनीने दोन दिवसात दंडाची रक्कम न भरल्यास 2 डिसेंबर रोजी झाडगाव येथील कंपनीच्या कार्यालयातील मनुष्यबळ विभाग सील करण्याचे लेखी आदेश तहसीलदार रत्नागिरी यांनी दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या निवासी नायब तहसीलदार व मंडळ अधिकारी रत्नागिरी यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे.

Comments