रत्नागिरी रेल्वे स्थानकातील सरकता जीना (एक्सलेटर) बंद असल्याने असंख्य प्रवाशांची गैरसोय


दै फ्रेश न्यूज (वृत्तसंस्था)-रत्नागिरी रेल्वे स्थानकातील सरकता जीना (एक्सलेटर) बंद असल्याने असंख्य प्रवाशांची गैयसोय होत आहे. बंद असलेला जिना लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या कालावधीत रेल्वे वाहतूक बंद झाल्यानंतर स्थानकावरील सर्वच यंत्रणा ठप्प झाली होती. कोरोनाची लाट हळुहळू ओसरू लागली असून ठप्प झालेली रेल्वे वाहतूक रूळावर आली आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर, मुख्य प्रवेशमार्गावर दोन सरकते जीने प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने सुरू केले आहेत. मुख्य प्रवेशमार्गावरील सरकता जीना गेली अनेक महिने दुरूस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. आजपर्यंत त्याची दुरूस्ती पूर्ण झालेली नाही. बंद असलेल्या जिन्यामुळे प्रवाशांची मोठी गैयसोय होत आहे.

Comments