रत्नागिरीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते नौसिन काझी यांनी रत्नागिरीतील उद्योजक दर्शन जैन यांच्याविरुध्द केली तक्रार; मुस्लीम समाजाविरुध्द तसेच अप्लसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांच्याविरुध्द खालच्या दर्जाच्या भाषेत फेसबुकवर पोस्ट केल्यामुळे पोलीस स्टेशनला केली तक्रार दाखल
रत्नागिरीतील बांधकाम उद्योजक दर्शन जैन, रा. थिबापॅलेस, रत्नागिरी यांनी मुस्लीम समाजाविरुध्द तसेच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांच्याविरुध अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेत फेसबुकवर पोस्ट केल्यामुळे रत्नागिरीतील मुस्लीम समाजामध्ये प्रचंड नाराजीचा सुर निर्माण झाला आहे. उद्योजक दर्शन जैन हे सोशल मिडीयावर सतत सामाजीक तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट नेहमी करत असल्याचे दिसुन येते असे जनतेमधून बोलले जात आहे. अशी माहीती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते नौसिन काझी यांनी सांगितले. दर्शन जैन यांनी मुस्लीम समाजाविरुध्द आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलीक यांच्या विरुध्द वापरलेली भाषा अत्यंत हिन दर्जाची असुन त्यामुळे सामाजीक शांतता भंग होण्याचा धोका असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते नौसीन काझी यांनी सांगितले. अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजामध्ये धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे भविष्यात शांतता सुव्यवस्था भांग होण्याची शक्यता निर्माण झाली असुन ऐन दिवाळीच्या सणावेळी अनुचित प्रकार घडू नये या करिता संबंधितांवर वेळीच कायदेशीर कार्यवाही करावी अशी तक्रार युवानेते नौसीन काझी यांनी केली आहे. युवानेते नौसीन काझी यांच्या समवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बशीर मुर्तुझा, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष जुबेर काझी, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे नेते हरीश शेकासन, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सिध्देश शिवलकर, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष मेहबुब मोगल, अब्दुल लतीफ मुल्ला, उबेद होडेकर, तालुका उपाध्यक्ष सुकेश शिवलकर, ग्रामपंचायत सदस्य उजेर काझी आदी पदाधीकारी उपस्थीत होते.उद्योजक दर्शन जैन यांनी पोलीस स्टेशनला संबंधीतांची माफी मागीतली असल्याचे समजते परंतू त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे राष्ट्रवादी काग्रेस पार्टी तर्फे सांगण्यात आले असुन तक्रार अर्जाची प्रत वरीष्ठ नेत्यांना पाठवली असल्याची माहिती नौसिन काझी यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment