आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या अध्यक्षतेखाली राजापूर तालुका पाणीटंचाई कृती आराखडा बैठक संपन्न

राजापुर तालुक्यातील सन २०२१-२२ च्या पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यासाठी पाणी टंचाई सभा माहे डिसेंबर नंतर राजापुर तालुक्यातील पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असुन सदर पाणी टंचाई दूर करण्याच्या दृष्टीने पाणी टंचाई ग्रस्त गाव व वाडांचा कृती आराखडा तयार करण्यासाठी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या सुचनेनुसार सदर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सभेमध्ये राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी टंचाईग्रस्त गांव व वाडयांचे प्रस्ताव १५ डिसेंबर पर्यंत देणेच्या सुचना दिल्या. तसेच  टंचाई ग्रस्त गांवाचे प्रत्येक गांवातील मुदतीत येणारे सर्व प्रस्ताव मंजूर करुन घेणेबाबत सूचित केले.

            आज राजापूर तालुका पंचायत समितीची पाणी टंचाई कृती आराखडा बाबत बैठक राजापूर -लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ राजनजी साळवी ह्यांच्या अध्यक्षखाली. पंचायत समिती राजापुर किसान भवन येथे पार पडली. त्याप्रसंगी उप विभागीय अधिकारी श्रीमती वैशाली माने, तहसीलदार श्रीमती शीतल जाधव, सभापती करुणा कदम, उप सभापती अमिता सुतार, गटविकास अधिकारी सागर पाटील, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, जिल्हा परिषद सदस्या सोनम बावकर, जिल्हा परिषद सदस्य गोपाळ उर्फ आबा आडीवरेकर, पंचायत समिती सदस्य प्रकाश गुरव, प्रशांत गावकर, प्रतीक मटकर, पंचायत समिती सदस्या विशाखा लाड, अश्विनी शिवणेकर, उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा दिवाकर पाटील, उप  अभियंता लघु पाठ बंधारे एस आर पानगले,  सहा भु वैज्ञानिक जि.प रत्नागिरी अजय सावंत, कनिष्ठ अभियंता निखिल मधाळे, स्वीय सहाय्यक सुभाष मालप तसेच सर्व  कर्मचारी वर्ग, सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते व आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Comments