रत्नागिरीतील प्रभाग ४ ची विकासकामे मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मंत्र्यांची भेट; कोकणनगर नागरिकांकडून समाधान आणि कौतुकांचा वर्षाव
रत्नागिरी शहरातील कोकण नगर, किर्तीनगर, क्रांतीनगरचा सध्याचा प्रभाग क्रमांक ४ हा भाग म्हाडा वसाहती अंतर्गत येतो. तसेच हा अल्पसंख्याक बहुल भाग आहे. कोकणनगर प्रभागाच्या विकासाच्या कामासाठी रत्नागिरी जिल्हा अल्पसंख्याक महासचिव नौसीन काझी, रत्नागिरी शहर अल्पसंख्याक शहर अध्यक्ष मुझफ्फर काझी, हरहुन्नरी सामाजिक तथा युना नेते नदाफ काझी यांनी महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नावाब मलीक तसेच महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण (म्हाडा) मंत्री जितेंद्रजी आव्हाड या कॅबिनेट मंत्र्यांना प्रभाग क्रमांक ४ च्या विकास कामांची निवेदने दिली.
रत्नागिरी जिल्हा अल्पसंख्याक कार्याध्यक्ष अन्सार मुल्ला, प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुजा, प्रदेश युवक सचिव तसेच ठाणे पालघर प्रभारी चेतन दळवी यांची साथ लाभली असल्याचे नौसीन काझी यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक ४ कोकणनगर, किर्तिनगर, क्रांतीनगर या भागाच्या विकासासाठी नवीन तरुण पिढी पुढे येत असुन महिला अल्पसंख्याक शहर अध्यक्ष सौ. सायमा नदाफ काझी यांचे कार्य पाहून या प्रभागातील नागरिक समाधान व्यक्त करत असुन या तरुणांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष बाब म्हणजे नावाब मलीक व जितेंद्र आव्हाड हे दोन्ही मंत्री अत्यंत व्यस्त असताना वेळ दिल्याबद्दल सर्वांनी अभार मानले.
Comments
Post a Comment