भास्कर जाधव --माणुसकीच्या दर्शन

गोरबरीबांचे कैवारी जणसेवक आदरणीय .....शेठ  अन आमदार भास्कर जाधवांच्या माणुसकीच्या दर्शनाने 'त्या' लहानगीची आई गहिवरली  चिपळूण (संतोष पिलके) : एका लहानगीचा मृतदेह दवाखान्यात केवळ बिल रक्कम संपूर्ण भरली नाही म्हणून थांबवून ठेवला होता....ही बाब त्या मुलीच्या वडिलांच्या मित्राला समजताच त्याने आमदार भास्कर जाधव यांना थेट फोन केला....जाधव साहेबांनी दोन मिनिटं वेळ दे एवढच सांगितलं.....आणि दुसऱ्या मिनिटाला त्या लहान मुलीचा मृतदेह तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आला......आणि त्या आईला गहिवरून आले......केवळ पैशाच्या अडचणीमुळे आपल्या लहान मुलीचा मृतदेह ताटकळत राहिलेला असताना त्या माऊलीच्या हृदयाला काय वेदना झाल्या असतील.....पण केवळ निवडणुकी पुरतेच आपली सजगता न दाखविणारे भास्करशेठ यांनी चुटकीसरशी समस्या सोडवून आपली कार्यतत्परता पुन्हा दाखवून दिली.                खेर्डी नजिकच्या गावातील एक लहान मुलगी दुर्दर आजाराने त्रस्त त्यामुळे जास्त आजारी झाल्याने तिला शहरातील एका खाजगी दवाखान्यात न्हेण्यात आले.तिथून तिला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली.आधीच पतीने अवेळी सोडलेली साथ त्यात हा दुःखाचा डोंगर एकीकडे कोसळला त्यामुळे ती माता पूर्ण हतबल झाली होती.असे असताना त्या मुलीचा मृतदेह बिलाचे पैसे पूर्ण न भरल्याने ताटकळत ठेवण्यात आला.याची खबर त्या मुलीच्या वडिलांचा मित्र पवार याना समजताच त्यांनी थेट भास्करशेठ जाधव यांना फोन करून वस्तुस्थिती कथन केली.परिस्थितीचे गंभीरता लक्षात घेऊन दोन मिनिटात विषय चुटकीसरशी सोडविला.अशावेळी त्या माउलीला भास्कर जाधवांचा मोठा आधार वाटला.यावेळी भास्करशेठ नाशिकमध्ये होते.तिथून त्यांनी थेट त्या हॉस्पिटलमध्ये फोन करून त्या मुलीचे बिल मी आल्यावर देतो आता तात्काळ तिचा मृतदेह द्या असे सांगितले.

Comments