पॅन इंडिया अवेरनेस अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात तळागाळातील लोकांपर्यंत ज्येष्ठ नागरिकांचे हक्क, अधिकार योजना याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम
मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार पॅन इंडिया अवेअरनेस कार्यक्रमाअंतर्गत वेगवेगळया उपक्रमांचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने केले आहे. रत्नागिरी जिल्हयातील गावोगावी लोकांना विधी सेेवेविषयी तसेच कायदेविषयक मार्गदर्शन केले जात आहे. पॅन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत जेष्ठ नागरिकांचे अधिकार याबाबत मौजे करबुडे, भोके, निवळी, हातखंबा आणि पानवल या ठिकाणी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अॅड. सोनाली शांताराम रहाटे, अॅड. इंदुमती मलुष्टे तसेच कायदासाथी श्री. अर्थव संजेश देसाई, श्री. अमित अजित वायकुळ आणि विधी विदयार्थी कु. रिया राजेंद्र माने यांनी सदरच्या कार्यक्रमामध्ये उपस्थीतांना मार्गदर्शन केले. जेष्ठ नागरिक हे स्वतः च एक सामाजिक वर्ग आहेत. ते अनुभव आणि ज्ञानाचा खजिना आहेत. तरीही समाजामध्ये त्यांची अवहेलना केली जाते आणि समाजातील तरुण वर्ग त्यांना समाजावरील बोजा असे समजून त्यांचा जवळजवळ त्यागच करतात. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक सतर्कतेचा स्तर, त्यांची कामे करण्याची क्षमता आणि अशाच इतर बाबींचा कशाप्रकारे विचार केला पाहिजे आणि त्यांना कशी वागणूक दयावी याबाबत जनजागृती करण्यात आली. जेष्ठ नागरिकांना अपरिमीत अशी सामाजिक, मानसिक आणि आर्थिक आव्हानाला सामोरे जावे लागते. रोजगार नसल्या कारणने आर्थिक समस्या येतात. ज्यांच्या परिणामी उत्पन्न आणि आर्थिक सुरक्षेत घट होत जाते आणि या सर्वाना परिणामी शारीरिक समस्यांमध्ये आरोग्य आणि वैद्यकिय समस्या येतात. त्यालाच अनुसरुन जेष्ठ माता पिता यांचे संरक्षण आणि त्यांच्या पोटगीचा अधिकार, मालमत्तेसंदर्भातील अधिकार, त्यांच्या कल्याणाचा अधिकार आणि वृध्दावस्थेसाठी पेन्शन योजना याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
Comments
Post a Comment