कोंडसर बुद्रुक येथे आयोजित नेत्र तपासणी शिबीरावरुन ग्रामपंचायत सदस्या सौ.प्रणिता पांचाळ यांचा आक्रमक पवित्राव, विकासात्मक चर्चा, ग्रामपंचायत स्तरावर होत असलेले कार्यक्रम यामध्ये डावलले जात असल्याचा आरोप
रत्नागिरी प्रतिनिधी:-
राजापूर तालुक्यातील कोंडसर बुद्रुक या गावामध्ये 7 नोव्हेंबर रोजी कोंडसर बुद्रुक ग्रामपंचायत व लायन्स आय हॉस्पिटल रत्नागिरी यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू तपासणी शिबिरावरुन गावातील ग्रामपंचायत सदस्या सौ. प्रणिता प्रशांत पांचाळ या आक्रमक झाल्या आहेत. मोफत नेत्र तपासणी शिबिर यासाठी जो बॅनर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, त्यामध्ये काही ग्रामपंचायत सदस्यांची नावे नाहीत. जे लोक ग्रामपंचायतीचे सदस्य नाहीत त्यांची नावे या बॅनर मध्ये आहेत. हे लोक नेमके कोण? असा सवाल सौ.प्रणिता पांचाळ यांनी उपस्थित केला आहे. जे लोक ग्रामपंचायत सदस्य नाहीत व ज्यांची नावे या बॅनर मध्ये आहेत या लोकांनी ग्रामपंचायतीच्या नेत्रतपासणी शिबिरासाठी काही विशेष योजना आखली आहे का?, काही विशेष योगदान देण्याचा मानस यांचा आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. मागील काही महिन्यांपासून या गावातील ग्रामपंचायतीच्या वतीने राबवण्यात येणारे विविध विकासाची कामे, विकास कामावर होणारी चर्चा, बैठका, ग्रामपंचायत स्तरावरून होत असलेले कार्यक्रम यामध्ये माझ्यासह काही ग्राम पंचायत सदस्यांना डावलण्यात येत आहे आणि याचा मी जाहीर निषेध करते. आम्ही सर्व सदस्य हे गाव पॅनलचे सदस्य असून गावाचा सर्वांगीण विकास हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून गावातल्या सर्व ग्रामस्थांनी आम्हाला ग्रामपंचायत सदस्य म्हणून संधी दिली आहे. आम्हाला डावलणे म्हणजेच ग्रामस्थांना डावलणे असा अर्थ होतो. जनतेचे प्रश्न ग्रामपंचायतीमध्ये उपस्थित करत असताना काही ठराविक लोकांमुळे आम्हाला अडचण येत असेल तर त्यात गावाचेच नुकसान आहे असे मत सौ. प्रणिता पांचाळ यांनी व्यक्त केले आहे.
Comments
Post a Comment