कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील तळवडे येथे मारहाण करत सशस्त्र दरोडा


दै फ्रेश न्यूज (वृत्तसंस्था)- कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील तळवडे (आंबा, ता. शाहूवाडी) येथील शंकरय्या स्वामी (वय 60) यांच्या घरावर मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास शस्त्रधारी टोळीने दरोडा टाकला. कुटुंबातील पुरूषांना कोयता व पारळीने मारहाण करत बांधून ठेवले. तर महिला व लहान मुलांना कोंडून ठेवले. त्यानंतर दरोडेखोरांनी घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने, बोलेरो जीप असा एकूण दहा लाख 40 हजार रुपयांचा ऐवज लुटला. तब्बल बारा तासानंतर बुधवारी सकाळी साडेसातच्या दरम्याने दरोडा पडल्याचे उघड झाले. शाहूवाही पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. पोलीस पथके दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

Comments