रत्नागिरी नगर राजभाषा कार्यान्वय समितीची अर्धवार्षिक बैठक मोठ्या उत्साहात संपन्न
भारत सरकार, गृह मंत्रालय, राजभाषा विभाग द्वारा हिंदी प्रचार- प्रसार करण्याच्या हेतुने गठित रत्नागिरी नगर राजभाषा कार्यान्वयन समितिची अर्ध वार्षिक बैठक न्यूक्लियर पावर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कार्यालय येथे २४ नोव्हेंबर २०२१ रोजी केशव कुमार (बँक ऑफ इंडिया ज़ोनल मैनेजर) यांच्या अध्यक्षते संपन्न झाली. सदर बैठकीस उपनिदेशक गृह मंत्रालय राजभाषा विभागाच्या डॉ. सुस्मिता भट्टाचार्य आणि बँक ऑफ इंडिया प्रधान कार्यालयाचे प्रतिनिधि उपमहाप्रबंधक शैलेश कुमार मालवी गूगल मीट द्वारे उपस्थित होते. समितीची अध्यक्षता बैंक आॉफ इंडिया विभागीय कार्यालयाकडे सोपवलेली आहे. या बैठकीला समितीचे सदस्य असणारे रत्नागिरी शहरातील केंद्र सरकारी कार्यालय, विमा कंपनी तथा बँकांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते. तसेच सदर बैठकीत २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये उत्कृष्ठ हिन्दी राजभाषा मध्ये कार्य केलेल्या विविध कार्यालयाना पुरस्कार देऊन सन्मानित केले. यामध्ये कोंकण रेल्वे, भारतीय तट रक्षक अवस्थान, सीमा शुल्क मंडल, आकाशवाणी केंद्र, न्यू इंडिया एशुरेंस कंपनी आणि पवन गुब्बारा वेधशाला याना पुरस्कार देऊन सन्मानित केले. सदर बैठकीस गृह मंत्रालय राजभाषा विभागाच्या उपनिदेशिका डॉ सुस्मिता भट्टाचार्य उपस्थित होत्या. त्यांनी या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व कार्यालयाच्या सहामहि रिपोर्टची पाहणी केली आणि भारत सरकारची राजभाषा कार्यान्वयनच्या अपेक्षा बद्दल माहिती करून दिली. नगर राजभाषा कार्यान्वयन समितीच्या प्रगतीचा आढावा निरंजन सामरिया, सदस्य सचिव, वरिष्ठ प्रबंधक, बँक ऑफ इंडिया यांनी घेतला. त्यावेळी समितीची बेबसाइटचा लाभ घेण्याविषयीचे आवाहन केले. समिती चे अध्यक्ष केशव कुमार, उप महाप्रबंधक बँक ऑफ इंडिया यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनाचे वेळी दैंनदिन व्यवहारामध्ये जनतेशी होणारा संवाद हा जनतेच्या भाषेमध्ये करणे गरजेचे आहे. सर्व सरकारी कार्यालयांना आवाहन केले की सरकारी कार्यालयांच्या कामकाजामध्ये एकसूत्रता आणण्याकरता हिंदी राजभाषेचा प्रयोग केला जात आहे. ही भाषा अत्यंत साधी सरल व सोपी आहे. तिचा प्रयोग जास्ती-जास्त होणे आवश्यक आहे. भारत सरकार, गृह मंत्रालय, राजभाषा विभाग द्वारा या समीतीला उप निदेशक डॉ सुस्मिता भट्टाचार्य ने समिती च्या कार्याबद्ल समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या. सदर बैठकीत उपस्थितांचे आभार सुश्री माधुरी उदयाशंकर, प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, पडवे, राजापुर यांनी केले.
Comments
Post a Comment