गोवळचे सरपंच अभिजित कांबळे यांनी घेतली आमदार प्रसाद लाड यांची भेट; विकास कामांच्या संदर्भात सादर केली निवेदने

भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व विधान परिषदेचे आमदार आणि भाजपचे नेते प्रसाद लाड यांची भाजपचे रत्नागिरी जिल्हा अनु. जा. सेलचे सरचिटणीस व गोवळचे सरपंच अभिजीत गणपत कांबळे यांनी, विजय गोवळकर यांच्या समवेत भेट घेतली. या भेटीमध्ये गोवळचे सरपंच अभिजीत कांबळे व विजय गोवळकर यांनी गोवळ गावासाठी विकास निधीची मागणी आमदार प्रसाद लाड यांच्या कडे केली आणि चार महत्वाच्या विकास कामांची निवेदने दिली. ही  गोवळ गावची ची चार कामे लवकरच मार्गी लावू असा खात्रशीर शब्द दिला आणि लगेच या कामांच्या प्रोसेसला सुरुवात करू सोमवार पासून असं सांगितले. आणि भविष्यात देखील खूप कामं आपण करू असे प्रसाद लाड म्हणाले. याच बरोबर राजापूर तालुक्यासाठी देखील विकास निधी मिळावा म्हणून मागणी लाड यांच्या कडे केली. त्या बाबत पण लाड म्हणाले राजापूर साठी पण लवकरच निधी देऊया. सदर भेट आमदार प्रसाद लाड यांच्या सायन (मुंबई )येथील पक्ष कार्यालयात घेण्यात आली.

टिप्पण्या