राजापूर नगर परिषदेत माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांची जयंती साजरी; राष्ट्रीय एकतेची शपथ घेण्यात आली

शुक्रवार दि.१९ नोव्हेंबर २०२१ भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त राजापूर नगर परिषद चे बॅ. नाथ पै. सभागृह येथे लोकनियुक्त नगराध्यक्ष अॅड . जमीर खलीफे यांच्या हस्ते स्व.इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार व गुलाब पुष्प अर्पण करण्यात आले व राष्ट्रीय ऐकतेची शपथ घेण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष तथा आरोग्य सभापती आसिफ मुजावर, माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक संजय ओगले, नगरसेवक हनिफ यु.काझी तसेच न. प. कर्मचारी उपस्थित होते.

Comments