रत्नागिरी नगर परिषदेच्यावतीने स्वच्छतेबाबतच्या जनजागृतीसाठी सायकल रॅलीचे आयोजन
रत्नागिरी नगर परिषदेचे आरोग्य सभापती निमेश नायर यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ सर्वेक्षण लिग 2022 अंतर्गत रत्नागिरी नगर परिषदेच्या वतीने भव्य पर्यावरण पूरक अशा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरी नगरपरिषद ते साळवी स्टॉप व साळवी स्टॉप ते रत्नागिरी नगरपरिषद अशीही रॅली काढण्यात आली या रॅलीच्या माध्यमातून पर्यावरणाच्या रक्षणासाठी सर्व जनतेने रत्नागिरी नगर परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. या रॅलीच्या सुरुवातीला स्वच्छतेबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. स्वच्छते बाबतच्या जनजागृतीसाठी स्वच्छता जनजागृती रथही तयार करण्यात आला होता. या सायकल रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Comments
Post a Comment