सव्वापाच हजार कोटींचा खर्च करून खरेदी केलेल्या शिवशाही व शिवनेरी बस गाड्यांमुळेच एसटी महामंडळ आणखी खड्डय़ात
दै फ्रेश न्यूज (वृत्तसंस्था)- एसटी महामंडळ सतत तोट्याच असल्याचे एसटी महामंडळाच्या वतीने सांगण्यात येत असले तरी संबंधित मंत्री व महामंडळाने घेतलेल्या अनेक निर्णयामुळेच एसटी महामंडळ आणखी तोट्यात येत आहे.
सव्वापाच हजार कोटींचा खर्च करून खरेदी केलेल्या शिवशाही व शिवनेरी बस गाड्यांमुळेच एसटी महामंडळ अडचणीत आल्याची बाब समोर आली आहे. लालपरीच्या तुलनेत या गाड्यांना ॲव्हरेज कमी, लालपरीच्या तुलनेत मोठी किंमत, अपघात सर्वाधिक, देखभाल-दुरुस्तीवरील सर्वाधिक खर्च, या बाबींचा विचार न करता महागड्या बस महामंडळाने खरेदी केल्या.चिंतेची बाब म्हणजे, या गाड्यांच्या उत्पन्नातून बस खरेदीचा खर्चही निघालेला नाही.शिवशाही व शिवनेरी बस गाड्यांना उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक करावा लागला. शिवनेरी बस गाड्यांच्या खरेदीसाठी जवळपास 195 कोटी रुपये तर शिवशाही बस खरेदीसाठी पाच हजार कोटी रुपयांचा खर्च झाला. शिवशाही बससेवा 2017 मध्ये तर शिवनेरी बससेवा 2008 पासून सुरू झाली. मात्र, अजूनपर्यंत या गाड्यांची किंमतदेखील वसूल झालेली नाही. या महागड्या गाड्यांवर सर्वाधिक खर्च झाल्यानेच महामंडळाचा संचित तोटा वाढल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
Comments
Post a Comment