प्राथमिक आरोग्य केंद्र कापरे येथे कोविड प्रादुर्भावानंतर झाले यशस्वी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर

प्राथमिक आरोग्य केंद्र कापरे तालुका चिपळूण येथे नेहमीच नावीन्य पूर्ण उपक्रम राबविले जातात. याचप्रमाणे कोविड प्रादुर्भावामुळे मागील दीड ते दोन वर्ष बंद असलेल्या शासकीय कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरे पुन्हा सुरू करण्याच्या शासनाच्या आदेशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठले यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात सर्व प्रथम हे शिबिर दिनांक 26-10-2021 रोजी आयोजित करण्यात आले आणि ते यशस्वीरित्या पारही पडले. खरवते व कापरे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावातील एकूण 15 लाभार्थींवर या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. विशेष म्हणजे मागील 8/9 वर्ष कापरे आरोग्य केंद्रातील ऑपरेशन थियेटर बंद होते. असे असताना रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष मिनल काणेकर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ज्योती यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ऑपरेशन थियेटर सुरू करून त्यामध्ये या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शिबिराचे उत्तम नियोजन केल्या मुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेले सर्जन डॉ.गरुड यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच शस्त्रक्रिया झालेले लाभार्थी व त्यांचे नातेवाईक यांनी ही समाधान व्यक्त केले.

Comments