रत्नागिरी शहरात रस्ते डांबरीकरणाला सुरुवात, जनतेमधून समाधान व्यक्त

रत्नागिरी प्रतिनिधी:-
रत्नागिरी शहरातील रस्ते खड्डेमय  झाले होते. त्यामुळे शहरातील नागरीकांना, तसेच ग्रामीण भागातील नागरिक, पर्यटक यांना खुप मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील आमदार उदय सामंत यांच्या प्रयत्नाने आता रत्नागिरी शहरातील रस्ते डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण सध्या जलद गतीने सुरु आहे. मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या वचनपूर्तीमुळे, रस्ते डांबरीकरणासाठी निधी मंजूर होऊन डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे जनतेमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 
मागिल काही महिन्यांपासून रत्नागिरी शहरात रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे नागरीकांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. मात्र रस्त्यांचे डांबरीकरण नेमके कोणकोणत्या कारणांमुळे रखडले याबाबत प्रत्येक वेळी मंत्री उदय सामंत पत्रकार परिषदांच्या माध्यमातून जनतेला माहीती देत होते. तसेच रस्ते डांबरीकरणासाठी निधी मंजूर करण्याबाबत कशा प्रकारे पाठपुरावा सुरु आहे याबाबतही मंत्री उदय सामंत माहिती देत होते. पावसाळ्यात रत्नागिरी शहरात गॅस पाईपलाईन तसेच नळपाणी योजनेच्या खोदाईच्या कामामुळे रस्त्यांवरील खड्डे तसेच गटारे यांमुळे नागरीकांना खुप मनस्ताप सहन करावा लागला. याबाबतही आढावा घेण्यात येत होता. या सर्व प्रयत्नांना आता यश आले असून रत्नागिरी शहरातील रस्ते डांबरीकरणासाठी निधी मंजूर झाला असून रस्ते डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात देखील झाली आहे. त्यामुळे जनतेमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Comments