आमदार प्रसाद लाड यांच्या आमदार निधीतून गणपतीपुळे येथे समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी अद्ययावत मशिनचा लोकार्पण सोहळा
भाजपा नेते व विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांच्या आमदार निधीतून रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे समुद्र किनारा व परिसर स्वच्छ करण्यासाठी अद्ययावत मशिन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या मशिनचा लोकार्पण सोहळा बुधवारी १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती
माजी खासदार निलेश राणे, जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन व जिल्हाधिकारी तसेच सर्व मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडणार आहे.
Comments
Post a Comment