शिवतर रोड येथील आरक्षण क्रमांक 7 मधील कामाला रामदास भाई कदम व योगेशदादा कदम यांच्या पाठपुराव्याने मिळाला निधी ः सतिश उर्फ पप्पू चिकणे


दै फ्रेश न्यूज (वृत्तसंस्था)- शिवतर रोड खेड येथील आरक्षण क्रमांक 7 मध्ये नवीन गार्डन तयार करणे या कामाला 2 कोटी 25 लाख रूपये निधी सन्माननीय श्री रामदास भाई कदम व आमदार योगेश दादा कदम यांच्या प्रयत्नांनी मिळाला आहे
हा निधी मिळण्याकरीता सन्माननीय श्री रामदास भाई कदम यांनी दिनांक 21/9/2021 रोजी नगरविकास मंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना पत्र दिले होते त्या पत्रा नुसार 3 नोव्हेंबर 2021 रोजी चे नगरविकास विभाग मंत्रालय यांनी वैशिष्ठ्य पुर्ण निधी योजने अंतर्गत या कामाला 2कोटी 25 लाख रूपये निधी मंजूर केला. सन्माननीय श्री रामदास भाई कदम यांनी नगरविकास मंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती केली व संपूर्ण 100% रक्कम राज्य सरकारने खर्च करावा व सदरचे काम चांगल्या उत्कृष्ट दर्जा चे ह्यावे या साठी ते सार्वजनिक बांधकाम विभाग खेड यांनी करावे अशी मागणी केली. 
त्यानुसार 4 नोव्हेंबर रोजी चे पत्रानुसार नगरविकास विभाग मंत्रालय यांनी जिल्हाअधिकारी यांना  आदेश दिले आहेत 
लवकरच हे विकास काम सुरू होईल. शिवतर रोड येथील रहिवासी सम्राट अशोक नगर, महात्मा फुले नगर, भैरी भवानी नगर, श्री स्वामी समर्थ मंदीर परिसर, शिवाई नगर, श्रेत्रपाल नगर, संत सेना नगर, स्वातंत्र्य विर सावरकर मार्ग, विद्याधन सोसायटी परीसर, योगायोग सोसायटी गणेश नगर या सर्व परिसरातील नागरिकांनी सन्माननीय श्री रामदास भाई कदम व आमदार योगेश दादा कदम यांचे जाहीर आभार मालले आहेत.
जे काही लोक खोटी नगरपरिषदेची पत्र दाखवून ह्या निधी साठी आम्ही मागणी केली असा भास करीत आहेत त्यांनी विकास कामात राजकरण करू नये येणार्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत नागरिक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील.

Comments