गांजा बाळगल्याचा आरोप
आरोपींच्या कोठडीत वाढ
दै फ्रेश न्यूज (वृत्तसंस्था)- बेकायदेशीरपणे सुमारे 20 हजार रुपये किंमतीचा गांजा हा अमली पदार्थ जवळ बाळगल्या प्रकरणातील 4 संशयितांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने मंगळवारी 2 दिवसांची वाढ केली.
बिलाल शेख (वय 20, रा.मच्छीमार्केट, रत्नागिरी), सलमान कोतवडेकर (वय 28, रा. खडप मोहल्ला, मिरकरवाडा, रत्नागिरी), संजय राणा (वय 19) आणि रामलाल राणा (वय 18, दोन्ही मूळ रा. नेपाळ, सध्या रा. मिरकरवाडा) अशी पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. शुक्रवार 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वा. यातील संशयित हे मच्छीमार्केट येथील खान कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये 667 ग्रॅम वजनाचा गांजा बाळगून असताना शहर पोलिसांतर्फे ही कारवाई करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली
होती. मंगळवारी त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता संशयितांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने 2 दिवसांची वाढ केली.
Comments
Post a Comment