युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) ‘कंबाइंड जीओ-सायंटिस्ट पूर्व परीक्षा २०२२’ दि. २० फेब्रुवारी २०२२ रोजी घेणार

त्यातून पुढील पदांची भरती करणार आहे.
(I) ‘जीऑलॉजिकल सव्र्हे ऑफ इंडिया (GSI)’, मिनिस्ट्री ऑफ माइन्समधील कॅटेगरी-क पदे.
(१) जीऑलॉजिस्ट – ग्रुप-ए – १०० पदे.
(२) जीओफिजिसिस्ट – ग्रुप-ए – ५० पदे.
(३) केमिस्ट ग्रुप-ए – २० पदे.
आणि (II) ‘सेंट्रल ग्राऊंड वॉटर बोर्ड’ (CGWB) मिनिस्ट्री ऑफ वॉटर रिसोस्रेसमधील कॅटेगरी-कक ची ग्रुप ‘ए’ पदे –
(४) सायंटिस्ट ‘बी’ (हायड्रोजीऑलॉजी) – २० पदे.
(५) सायंटिस्ट ‘बी’ (केमिकल) ग्रुप-ए – १ पद,
(६) सायंटिस्ट ‘बी’ (जीओफिजिक्स) ग्रुप-ए – १ पद.
पात्रता –
(१) GSI मधील जीओलॉजिस्ट पदांसाठी जीऑलॉजिकल सायन्स/जीऑलॉजी/अॅप्लाइड जीऑलॉजी/ जीओएक्स्प्लोरेशन/जीओकेमिस्ट्री इ. विषयातील मास्टर्स डिग्री.
(२) GSI मधील जीओफिजिसिस्ट आणि CG.W.B मधील सायंटिस्ट ‘बी’ (जीओफिजिक्स) या पदांसाठी एम्.एस्सी. (फिजिक्स/अॅप्लाइड फिजिक्स/जीओफिजिक्स/अॅप्लाइड जीओफिजिक्स/मरिन जीओफिजिक्स इ.)
पद क्र. (३) केमिस्ट आणि पद क्र. (५) सायंटिस्ट ‘बी’ (केमिकल) या पदांसाठी एम्.एस्सी. (केमिस्ट्री/अॅप्लाइड केमिस्ट्री/ अॅनालायटिकल केमिस्ट्री)
पद क्र. (४) सायंटिस्ट ‘बी’ (हायड्रोजीऑलॉजी) – जीऑलॉजी/अॅप्लाइड जीऑलॉजी/मरिन जीऑलॉजी/हायड्रोजीऑलॉजी या विषयांतील पदव्युत्तर पदवी.
पद क्र. (६) सायंटिस्ट ‘बी’ (जीओफिजिक्स) – एम्.एस्सी. (फिजिक्स/अॅप्लाइड फिजिक्स/ जीओफिजिक्स/अॅप्लाइड जीओफिजिक्स/मरिन जीओफिजिक्स) किंवा इंटिग्रेटेड एम्.एस्सी. (एक्स्प्लोरेशन जीओफिजिक्स) किंवा एम्.एस्सी. (टेक्नॉलॉजी) (अॅप्लाइड जीओफिजिक्स).
पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. (परीक्षेच्या स्टेज-३ साठी निवडलेल्या उमेदवारांनी पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्याचा पुरावा स्टेज-३ साठी डिटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्म भरते वेळी सादर करणे आवश्यक आहे.)
वयोमर्यादा – (दि. १ जानेवारी २०२२ रोजी) सर्व पदांसाठी २१ ते ३२ वर्षेपर्यंत. (उमेदवाराचा जन्म दि. २ जानेवारी १९९० ते १ जानेवारी २००१ दरम्यानचा असावा.) इमाव – ३५ वर्षेपर्यंत, अजा/अज – ३७ वर्षेपर्यंत, (दिव्यांग उमेदवार – खुलागट – ४२ वर्षेपर्यंत, इमाव – ४५ वर्षेपर्यंत, अजा/अज – ४७ वर्षेपर्यंत); (GSI आणि CGWB चे कर्मचाऱ्यांसाठी संबंधित खात्यातील पदांसाठी – ३९ वर्षेपर्यंत).
निवड पद्धती – स्टेज-१ – कंबाइंड जीओसायंटिस्ट (प्रीलिमिनरी) एक्झामिनेशन, २०२२ (ऑब्जेक्टिव्ह टाइप पेपर्स ४०० गुणांसाठी) जी दि. २० फेब्रुवारी २०२२ रोजी घेतली जाईल. यातून स्टेज-२ साठी रिक्त पदांच्या ६ ते ७ पट उमेदवार निवडले जातील. (पेपर-१ जनरल स्टडीज – १०० गुणांसाठी, वेळ २ तास; पेपर-२ संबंधित विषयावर आधारित ३०० गुणांसाठी, वेळ २ तास) प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातील. कॅलक्युलेटर वापरास परवानगी नाही.
परीक्षा केंद्र – मुंबईसह देशभरातील १९ केंद्रे.
स्टेज-२ – कंबाइंड जीओसायंटिस्ट (मेन) एक्झामिनेशन, २०२२ (पारंपारिक पद्धतीचे पेपर्स – ६०० गुणांसाठी) जी दि. २५ व २६ जून २०२२ रोजी घेतली जाईल. (संबंधित विषयावर आधारित २०० गुणांसाठी ३ पेपर्स प्रत्येकी ३ तासांसाठी) परीक्षेच्या वेळी (नॉन-प्रोग्रॅमेबल टाइप पॉकेट) कॅलक्युलेटर वापरण्यास परवानगी असेल.
परीक्षा केंद्र – मुंबईसह देशभरातील ९ केंद्रे.
स्टेज-३ – व्यक्तिमत्त्व चाचणी / मुलाखत- २०० गुणांसाठी. (यातील पात्रतेसाठी गुणांची कोणतीही अट नाही.)
अंतिम निवड स्टेज-१ – प्रीलिमिनरी एक्झामिनेशन, स्टेज-२ – मेन एक्झामिनेशन आणि स्टेज-३ – व्यक्तिमत्त्व चाचणी / मुलाखतमधील एकत्रित कामगिरीवर आधारित केली जाईल.
समान पात्रतेचे निकष असलेल्या दोन्ही पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्जाचे शुल्क – रु. २००/-. (अजा/अज/दिव्यांग/महिला उमेदवारांना शुल्क माफ आहे.)
(कंबाइंड जीओ-सायंटिस्ट (प्रीलिमिनरी) एक्झामिनेशन २०२२ साठी) ऑनलाइन अर्ज https://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि. १२ ऑक्टोबर २०२१ (१८.०० वाजे)पर्यंत करावेत.
शंकासमाधानासाठी फोन नं. ०११-२३३८११२५/२३३८५२७१/२३०९८५४३.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA मध्ये पुढील ५६५ पदांची सरळसेवा भरती.
(i) गट-क मधील पदे –
(१) कनिष्ठ लिपिक – टंकलेखक – २०७ पदे (अजा – २८, अज – १३, इमाव – ४४, विजा-अ – ४, भज-ब – ३, भज-क – ७, भज-ड – ४, विमाप्र – ५, ईडब्ल्यूएस – २१, अराखीव – ७८).
पात्रता – पदवी उत्तीर्ण आणि मराठी टंकलेखनाचे किमान ३० श.प्र.मि. वेगमर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० श.प्र.मि. वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
(२) लघुटंकलेखक – २० पदे (अजा – ३, अज – १, विजा-अ – १, भज-ब – १, भज-क – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस् – २, अराखीव – ७).
पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र ही लघुलेखनाची परीक्षा ८० श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखनाची परीक्षा ४० श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखनाची परीक्षा ३० श.प्र.मि. उत्तीर्ण असावी.
(३) भूमापक – ११ पदे (अजा – १, अज – १, विजा-अ – १, भज-ब – १, इमाव – १, ईडब्ल्यूएस् – १, अराखीव – ५).
पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि भूमापक (र४१५ी८१) या विषयाचे दोन वर्षांचे आयटीआयकडील प्रमाणपत्र.
(४) अनुरेखक – ७ पदे (अजा – १, अज – १, इमाव – १, विजा-अ – १, ईडब्ल्यूएस् – १, अराखीव – २).
पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि इंटरमिडिएट ग्रेड चित्रकला परीक्षा किंवा स्थापत्य आरेखक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा वास्तुशास्त्रातील आयटीआय प्रमाणपत्र.
(५) स्थापत्य अभियांत्रिकी सहायक – ४४ पदे (अजा – ५, अज – २, इमाव – ९, विजा-अ – १, भज-क – १, भज-ड – १, विमाप्र – १, ईडब्ल्यूएस् – ४, अराखीव – २०).
पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकीमधील आयटीआयचे प्रमाणपत्र किंवा समतूल्य अर्हता.
(६) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – ११९ पदे (अजा – ११, अज – १०, इमाव – १७, विजा-अ – ३, भज-ब – ३, भज-क – २, भज-ड – १, विमाप्र – ४, ईडब्ल्यूएस् – १२, अराखीव – ५६).
पात्रता – स्थापत्य शाखेतील इंजिनीअरिंग पदविका किंवा समतूल्य अर्हता.
(७) कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायक – ६ पदे (अजा – १, अज – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस् – १, अराखीव – १).
पात्रता – वास्तुविशारद विषयातील पदवी/पदव्युत्तर पदवी आणि काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चर (COA) मध्ये नोंदणी झालेली असावी.
(८) साहाय्यक – १८ पदे (अजा – ३, इमाव – ४, विजा-अ – १, ईडब्ल्यूएस् – २, अराखीव – ८).
पात्रता – पदवी उत्तीर्ण आणि प्रशासकीय कामाचा ५ वर्षांचा अनुभव.
(९) वरिष्ठ लिपिक – ७३ पदे (अजा – १०, अज – ४, इमाव – १४, विजा-अ – २, भज-ब – २, भज-क – ३, भज-ड – १, विमाप्र – १, ईडब्ल्यूएस् – ७, अराखीव – २९).
पात्रता – पदवी उत्तीर्ण आणि प्रशासकीय कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव.
(ii) गट-ब मधील पदे –
(१०) सहायक विधि सल्लागार – २ पदे (अजा – १, अराखीव – १).
पात्रता – कायदा विषयातील पदव्युत्तर पदवी आणि भूधारणा, मालमत्तेचे हस्तांतरण, घरबांधणी, मालकी हक्काचे फ्लॅट्स, सहकारी गृहनिर्माण संस्था आणि इतर प्राधिकरणाशी संबंधित असलेला किमान ५ वर्षांचा अनुभव.
(११) सहायक अभियंता (स्थापत्य) – श्रेणी-२ – ३० पदे (अजा – ६, अज – ४, इमाव – ४, विजा-अ – १, ईडब्ल्यूएस् – ३, अराखीव – १२) १ पद दिव्यांगांकरिता राखीव.
पात्रता – स्थापत्य शाखेतील पदवी किंवा समतूल्य अर्हता.
(१२) मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी – २ पदे (अजा – १, अराखीव – १).
पात्रता – पदवी आणि बिझनेस मॅनेजमेंट (मार्केटिंग/फिनान्स) पदवी/पदविका आणि संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव.
(iii) गट-अ मधील पदे –
(१३) उपअभियंता (स्थापत्य) – १३ पदे (अजा – २, इमाव – २, भज-क – १, ईडब्ल्यूएस् – १, अराखीव – ७) (१ पद दिव्यांगांकरिता राखीव).
पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकी किंवा बांधकाम शाखेतील पदवी आणि ३ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव.
(१४) कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – १३ पदे (अजा – १, इमाव – ३, विजा-अ – १, ईडब्ल्यूएस् – १, अराखीव – ७) (१ पद दिव्यांगांकरिता राखीव).
पात्रता – स्थापत्य अथवा बांधकाम शाखेतील पदवी आणि किमान ७ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव.
समांतर आरक्षणामधील जागा – महिला ३०%, माजी सैनिक – १५%, प्रकल्पग्रस्त – ५%, भूकंपग्रस्त – २%, खेळाडू – ५%, अंशकालीन – १०%, अनाथ – १%
दिव्यांगांसाठी आरक्षित पदे – गट-क संवर्गातील २० पदे दिव्यांगांकरिता आरक्षित ((अ) अंध/अल्पदृष्टी – ५ पदे; (ब) कर्णबधिरता/ऐकू येण्याची दुर्बलता – ५ पदे; (क) अस्थि-व्यंगता/मेंदूचा पक्षघात इ. – ५ पदे; (ड) स्वमग्नता/मंदबुद्धी इ. व (अ) ते (ड) मधील – ५ पदे)
निवड पद्धती – २०० गुणांची ऑफलाइन/लेखी परीक्षा पदनिहाय घेतली जाईल. पद क्र. १ ते ५, ८ व ९ करिता मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी ५० गुण, एकूण २०० गुण. (पद क्र. २ लघुटंकलेखक पदासाठी ५० गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल.)
पद क्र. ६, ७ व १० ते १४ साठी मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान व बौद्धिक चाचणी प्रत्येकी २५ गुण याप्रमाणे १०० गुण आणि संबंधित शाखेतील १०० गुण याप्रमाणे.
परीक्षा शुल्क – अमागास प्रवर्ग – रु. ५००/-, मागास प्रवर्ग – रु. ३००/-. परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर २०२१ आहे. (२३.५९ वाजेपर्यंत) (माजी सैनिकांना परीक्षा शुल्क लागू नाही.) उमेदवारांस एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल.
ऑनलाइन अर्ज भरण्यासंबंधी अडचणी आल्यास दूरध्वनी क्र. ०२२-६६४०५४५७ वर संपर्क साधा.
ऑनलाइन अर्ज http://www.mhada.gov.in या संकेतस्थळावर दि. १४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत करावेत.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment