SBI मारुती मंदिर शाखेतील गर्दी पाहता दुसर्या काऊन्टरची मागणी
रत्नागिरी: करोना नंतर दैनंदिन व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत . त्यामुळे साहाजिकच बॅकांमध्ये गर्दी होत आहे . ह्या गर्दीला कमी करण्यासाठी SBI मारुती मंदिर(आरोग्य मंदिर नाचणेरोड ) शाखेने एक पर्याय शोधलाय ! एक एजन्ट नेमला गेला आहे त्यांच्या मार्फत २० हजारापर्यन्त कॅश स्विकारली जाते आणखी विषेश म्हणजे त्याचे कार्यालय बॅकेत नसून दुसऱ्या ठीकाणी आहेत . मारूती मंदिर परिसरातील रहिवाशांनी SBI च्या मुख्य शाखेत गर्दी असल्याने बराच वेळ वाया जातो तो वाचवण्यासाठी आपली खाती या शाखेत वर्ग करून घेतली हीच सर्वाची डोकेदुखी झाली आहे . मारूती मंदिर शाखेत गर्दी वाढल्याने ती कमी करण्यासाठी एजन्ट चा उपाय शोधण्यात आला आहे . त्यामुळे जेष्ठ नागरिकांची ससेहोलपट होत आहे. या शाखेती संथगतीने हाेत असल्याने कॅश काऊन्टर वर बरीच गर्दी असते त्यानी जलदगतीने काम केल्यास आणि दूसरा काऊन्टर चालू केल्यास गर्दी कमी होईल आणि बॅकेत येवून परत एजन्ट कार्यालयात जाण्याचा त्रास वाचेल तरी संबंधितांनी खातेदारांचे हित लक्षात घेवून या शाखेत दुसरा काऊन्टर चालू करावा. एजन्ट कडील हेलपाटे बंद करावे अशी मागणी होत आहे त्यामुळे जेष्ठ नागरिकांचे आणि अति महत्वाचे काम असणाऱ्या व्यक्तीचे त्रास वाचेल.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा