रत्नागिरी जिल्हा OBC संघर्ष समन्वय समितीची कार्यकारणी जाहीर
रत्नागिरी जिल्हा ओबीसी संघर्ष समितीच्या जिल्हाध्यक्ष पदी शरदचंद्र गीते संगमेश्वर, तर सेक्रेटरी पदी गुहागरचे युवा शिलेदार संतोष सोलकर , खजिनदारपदी लांजाचे बी. टी. कांबळे यांची नियुक्ती...!
रत्नागिरी- कोकण ओबीसी जनमोर्चा आणि ओबीसी संघर्ष समन्वय समिती – रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी निवड सभा चिपळूण येथील बाईत हॉस्टेल सभागृहात रविवार दि. 10 ऑक्टोबर 2021 रोजी पार पडली. या निवड सभेला जिल्यातील 9 तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते व तालुका पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य जनमोर्चा अध्यक्ष मा. आमदार प्रकाश अण्णा शेंडगे, कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, उपाध्यक्ष जे. डी. तांडेल, सरचिटणीस अरविंद डाफळे, चिटणीस कृष्णा वणे, पालघर जिल्हा समन्वयक सौ.सुवर्णाताई पाटील, रत्नागिरी जिल्हा समन्वयक, संभाजी काजरेकर, माधव कांबळे. चिपळूण शाखाध्यक्ष चंद्रकांत कोकमकर तसेच ओबीसी संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष सर्व श्री पी. जी. पाते, नंदकुमार मोहिते, अमित कदम, एड. अशोक निकम, भाऊ गीते, दिपक बेंद्रे, वसंत घडशी, रमेश पांगत तसेच पंचायत समिती सदस्या, सौ. साक्षी रावणग, सौ. स्नेहा चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य गोपाळ उर्फ आबा आडीवडेकर, झगडे आणि ग्रामीण पातळीवरील अनेक ओबीसी समाजातील मान्यवर उपस्थित होते.
ओबीसी जिल्हा कार्यकारिणी मध्ये जिल्ह्यातील एकूण ५४ जणांची निवड करण्यात आली. निवडी नंतर उपस्थित मान्यवरांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा