शब्द लहरी

 

      

 शब्द लहरी 

----------------------------
ज्ञानेश्वरीतील   सुंदर  प्रतिमाने


तैसी  नीजवृत्ती  जेथ  सांडे  
तेथ  स्वतंत्रते  वस्ती  न  घडे । आईका  प्रजाहो  हे  पुढे । विरंचि
म्हणे  ।।

        म्हणौनि  स्वधर्मु  जो  सांडिल । तयाते  काळू  दंडील ।
चोरू  म्हणौनि  हरील । सर्वस्व
तयाचे ।।

        मग  सकळ  दोषु  भक्ते  ।
गिंवसोनि  घेती  तयाते ।  रात्री
 समयी  स्मशानाते । भूते  ज़ैसी।।


           त्याप्रमाणे  ब्रह्मदेव  म्हणतात  प्रजाजन हो  जो
आपापल्या  वर्णाश्रम धर्माचे
आचरण  सोडतो  त्याचे  स्वातंत्र्य
खरोखर  नष्ट  होते  हे  नीट  ऐका.

         स्वधर्माचा  जो  त्याग  करील   त्याला  काळ- यमधर्म
शिक्षा  करील .आणि  हा केवळ चोर  आहे असे  समजून  त्याच्या
सर्वस्वाचे  हरण  करील .

         मग  रात्र  झाल्यावर  स्मशानाला  जशी  भूते  व्यापून
टाकतात  तशी  सर्व  संकटे
त्याच्याजवळ  येऊन  त्याला
ग्रासतात .


सौ.  शैलजा  जाधव (पाटील)
           चांदवड   नासिक
--------------------------------------------------
    निसर्ग

फळे देणारी वृक्षे तर माणसासाठी वरदानच आहे.शाकाहारी भोजन फळांशिवाय असंतुलित मानले जाते. आंबे,द्राक्षे,पपई,केळी अशा सर्वच फळांचा गोडवा आणि पौष्टिकता तर सर्वांना माहितच आहे.झाडांमुळे चांगला पाऊस पडतो,भूरक्षण होते आणि वायू प्रदूषण कमी होते.एवढेच नाही,लाख आणि रेशीमचे कीटक झाडांवर भरभराट करतात. कागद पाइन आणि बांबूपासून बनविला जातो. याशिवाय इमारत बांधकाम आणि फर्निचर इ. मध्ये लाकडाचा वापर केला जातो. त्यामुळे लाकडाची उपयुक्तता तर सर्वज्ञात आहे. अशा प्रकारे, मनुष्याच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत झाडे त्याची सोबती असतात. झाडे आपल्याला नैतिकता आणि परोपकाराचा संदेश देखील देतात.

सौ.प्रतिमा अरुण काळे
निगडी प्राधिकरण पुणे,४४

------------------------------------------------
   माझी लेखणी 

 प्रत्येकाने आपले कौतुक 
केलेच पाहिजे हे गरजेचं नाही
परंतु आपण कोणाचे वाईट 
करू नये व आपलेही कुणी 
 वाईट करू नये असा आपला 
प्रयत्न असावा.....

कल्पना टेंभूर्णीकर नागपूर 

टिप्पण्या

news.mangocity.org