दोणवली येथे डोळे व मोतीबिंदू तपासणी आणि अल्प मोबदल्यात चष्मे वाटप तसेच असांसर्गिक आजाराची तपासणी शिबिर


 दोणवली येथे डोळे व मोतीबिंदू तपासणी आणि अल्प मोबदल्यात चष्मे वाटप तसेच असांसर्गिक आजाराची तपासणी शिबिर

 भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन...

चिपळूण रत्नागिरी,

चिपळूण तालुक्यातील ग्राम पंचायत दोणवली NAB आय हॉस्पिटल चिपळूण, सावंत ऑप्टीशियन चिपळूण आणि लोकजागृती फाऊंडेशन रत्नागिरी यांचे संयुक्त विद्यमाने आणि आरोग्य वर्धीनी प्राथमिक आरोग्य केंद्र कापरे यांचे पुढाकाराने प्राथमिक शाळा बामणेवांडी दोनवली येथे सोमवार  दिनांक ११ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० ते २ या वेळात  सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात सर्व वयोगटातील नागरिकांची डोळे तपासणी NAB  आय हॉस्पिटल चिपळूण  चे माध्यमातून करण्यात येणार असून त्यातील मोतीबिंदू शस्त्रक्रिया आवश्यक असणाऱ्या नागरिकांची NAB आय हॉस्पिटल मार्फत शस्त्रकिरिया ही करण्यात येणार आहेत. तसेच ज्यांना चष्म्याची आवश्यकता आहे अशा नागरिकांना सावंत ऑप्टीशियन चिपळूण यांचे माध्यमातून अल्प दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कापरे यांचे वतीने ३९  वर्षा वरील सर्व नागरिकांची असंसर्गिक आजाराची त्या मध्ये मदुमेह, उच्च रक्तदाब, कर्क रोग, वजन , उंची याची तपासणी करून उपचार ही केले जाणार आहेत. 

ग्रामपंचायत दोणवली यांचे पुढाकाराने आणि लोकजागृती फाऊंडेशन रत्नागिरी यांचे संकल्पनेतून सदर शिबिर यशस्वी करण्यात येत आहे या साठी प्रभागातील जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य सरपंच , उप सरपंच , ग्रामपंचायत सदस्य आरोग्य केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी , ग्रामपंचायत कर्मचारी हे मेहनत घेत आहेत.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या