रत्नागिरीत महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद, व्यापाऱ्यांचा बंदला विरोध


रत्नागिरीत महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद, व्यापाऱ्यांचा बंदला विरोध

रत्नागिरी

लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटकपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी सोमवारी बंदची हाक दिलीय.

रत्नागिरी जिल्ह्यात आजच्या महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. नागरिक विविध कारणांनी घराबाहेर पडत आहे. जिल्ह्यातील खेड, लांजा, राजापूर या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी बंदला विरोध दर्शवला आहे. तर, रत्नागिरी आणि चिपळूण या ठिकाणी दुपारी एक वाजेपर्यंत बंद पाळला जाणार आहे आजच्या दिवशी एसटीसेवेसह अत्यावश्यक सेवेवर मात्र कोणताही परिणाम होणार नाही त्यामुळे जिल्ह्यातील एकंदर परिस्थिती पाहता आजच्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र सध्या आहे.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या