पॅन इंडिया अवेअरनेस अंतर्गत शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ दुर्बल लोकांपर्यंत पोचवण्यासाठी शिबीराचे आणि प्रदर्शनाचे आयोजन.


 पॅन इंडिया अवेअरनेस अंतर्गत शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ दुर्बल लोकांपर्यंत पोचवण्यासाठी शिबीराचे आणि प्रदर्शनाचे आयोजन.

 

                           मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार पॅन इंडिया अवेअरनेस कार्यक्रमाअंतर्गत वेगवेगळया उपक्रमांचे आयोजन करण्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने नियोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक १६/१०/२०२१ रोजी लाेकांना त्यांचे हक्क, अधिकार प्रत्यक्ष मिळावेत यासाठीचे उपक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे राबविले जात आहे. त्यासाठी शासनाचे वेगवेगळे विभाग, बॅंका, पोस्ट ऑफिस यांचे कार्यालयातर्फे राबविल्या जाणा-या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्राधिकरणाने शिबीराचे आयोजन जिल्हा न्यायालय, रत्नागिरी येथे केले आहे. तसेच शासनाच्या आणि विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध योजनांची माहिती देणारे फलक यांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. 

                           प्राधिकरणातर्फे जिल्हा न्यायालय, रत्नागिरी याठिकाणी दिनांक १६/१०/२०२१ रोजी शिबीराचे आणि प्रदर्शनाचे आयोजन सकाळी १०.०० वाजता केलेले आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, सामाजिक न्याय विभाग, महिला व बालविकास, विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ, आरोग्य विभाग यांच्यामार्फत राबविल्या जाणा-या वेगवेगळया योजना तसेच बॅंका व पोस्ट आॅफिस मार्फत राबविल्या जाणा-या योजना याचा प्रत्यक्ष लाभ तात्काळ लोकांना दयावयाचा आहे. त्यासाठी लोकांना जागीच बॅंकेची, पोस्टाची खाती उघडून देणे, जागीच नमुने भरून देणे, योजनांचा तात्काळ लाभ देणे याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच तळागाळातील लोकांना त्यांचे हक्क आणि अधिकार चित्ररूपाने प्रदर्शनात समजून घेता येतील.

                           शिबीरामध्ये खालील नमुद केल्याप्रमाणे कागदपत्र बॅंक खाते उघडण्यासाठी आणि योजनांचा फायदा घेण्यासाठी सोबत आणण्याचा सुचना त्यांच्यामार्फत गरजू लोकांना देण्यात याव्यात.

१.          बॅक खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे -

             आधारकार्ड/मान्यतापात्र ओळखपत्र, रेशनकार्ड अथवा तेथील रहिवासी असल्याचा पुरावा.

२.          सुकन्या समृध्दी योजना खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे -

             मुलगी ० ते १० वयोगटातील आहे हे दाखविण्यासाठी मुलीचा जन्मदाखला, आधारकार्ड, आई-वडीलांचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड. (आधारकार्ड नसल्यास तेथेच काढून देण्यासाठी उपाययोजना केली जाईल.) आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी कमीत कमी रक्कम रूपये ५००/-.

३.          विमा योजना खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे -

             आधारकार्ड अथवा मान्यतापात्र आवश्यक ओळखपत्र, रेशनकार्ड अथवा तेथील रहिवासी असल्याचा पुरावा/पत्त्याचा पुरावा, दोन छायाचित्र, प्रधान मंत्री सुरक्षा विमा कमीत कमी रक्कम रूपये १०१/- (वय १८ ते ७० वर्षे) आणि प्रधान मंत्री जीवन ज्याेती विमा रक्कम रूपये ३३०/- (वय १८ ते ५० वर्षे) आणि अटल पेन्शन योजना रक्कम रूपये ४२/- ते २१०/- (वय १८ ते ४० वर्षे) 

४.          पोस्ट खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे -

             केवळ आधारकार्ड. (आधारकार्ड नसल्यास तेथेच काढून देण्यासाठी उपाययोजना केली जाईल.)

५.          मागासवर्गीय लाभार्थीसाठी थेट कर्ज रक्कम रूपये १,००,०००/-

             मागासवर्गीय असल्याचा दाखला, रहिवासी असल्याचा दाखला, वय वर्षे १८ ते ५५ असल्यासंदर्भात जन्मदाखला, गेल्या सहा महिन्यातील आर्थिक परिस्थिती काय होती याबाबत पुरावा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रूपये १,००,०००/- पेक्षा कमी असल्याबाबतचा पुरावा कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड आणि संलग्न बॅंक खाते नसल्यास तात्काळ काढण्यासाठी वरील आवश्यक कागदपत्रे आणि अटीची पूर्तता, जातीचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, दोन छायाचित्र, व्यवसायासाठी ग्रामपंचायत, नगरपरिषद यांचे नाहरकत प्रमाणपत्र, व्यवसाय ठिकाणचा सातबारा उतारा अथवा भाडेकरार, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, इत्यादी. त्यानंतर आवश्यक बाबींची पूर्तता संबंधित कार्यालयात करणे आवश्यक. त्याप्रमाणे रक्कम रूपये १०,००,०००/- ते ५०,००,०००/- पर्यंत कर्ज योजना मिळण्यासाठी माहिती उपलब्ध करून दिली जाईल.

६.          रत्नागिरी आरोग्य विभाग, जिल्हापरिषद, रत्नागिरी

             जननी सुरक्षा योजना, दारिद्रय रेषेखालील आणि अनुसुचित जाती व जमातीमधील महिला, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, इत्यादी

७.          कॅन्सर, ह्दयरोग व किडनी संदर्भात दुर्धर आजाराने पिडीत रूग्णांना अंशत: आर्थिक मदत -

             रेशनकार्ड, तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, सरपंच यांचा दाखला, (भुमिहिन, दारिद्रय रेषेखालील, स्वातंत्रसैनिक यांना प्राधान्य), महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना अथवा अन्य शासकीय योजनांचा लाभ घेतला नसल्याबाबतचा प्रतिज्ञापत्र रक्कम रूपये १००/- स्टॅम्प पेपरवर, शासनमान्य प्राधिकृत रूग्णालय तज्ञ डॉक्टर यांचा आजाराबाबत मुळ प्रमाणपत्र आणि रूग्णालयाची मुळ वैदयकीय देयके, बॅक खाते क्र. आणि आय.एफ.एस.सी.कोड.

८.          आधारकार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्र -

             पॅनकार्ड, रेशनकार्ड, मतदान कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, विवाहीत स्त्रीचे नाव बदलायचे असल्यास गॅझेटचा दाखला तसेच मॅरेज सर्टीफिकेट, जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, बॅंक पासबुक, जन्माचा दाखला, लहान मुलांसाठी आई-वडीलांचे आधारकार्ड, तसेच शाळेचे ओळखपत्र, इत्यादी.

                           तरी गरजू लोकांनी शिबीराला उपस्थित राहून याेग्य प्रकारचा लाभ घ्यावा, असे आव्हान मा. वरिष्ठ न्यायाधीश व सचिव, रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी जनतेला केले आहे.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या

news.mangocity.org