नामदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत चिरेखाण व्यवसायाच्या संदर्भातील अडचणी संदर्भात सभा संपन्न
आज रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री महोदय नामदार उदय जी सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र शासन, सन्माननीय जिल्हाधिकारी श्री बी एन पाटील , खनिकर्म अधिकारी माननीय श्री पाटील , ॲडिशनल कलेक्टर माननीय श्री खांडेकर साहेब जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी साहेब, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री दादा डोंगरे, उपाध्यक्ष माननीय श्री प्रकाश जाधव, कोषाध्यक्ष माननीय श्री बापू डोंगरे आणि जिल्ह्यातील अनेक खाणमालक यांच्या उपस्थितीत जांबा चिरेखाण व्यवसायाच्या संदर्भातील अडचणी संदर्भात सभा संपन्न झाली .
माननीय मंत्री महोदय श्री उदय जी सामंत यांनी अत्यंत योग्य प्रकारे आणि सविस्तर अभ्यास करून या व्यवसायातील तांत्रिक अडचणींची कल्पना प्रशासनाला दिली. प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे सर्व खान व्यवसायिक ऑनलाइन एप्लीकेशन व ई पास साठी तयार असून त्यासाठी लागणारं नेटवर्क व व्यवस्था प्रशासनाने प्रत्येक खाणीवर निर्माण करून द्यावी म्हणजे प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे E पास कार्यप्रणाली अमलात आणता येईल. थोडक्यात प्रशासनाने आदेश देताना येथील भौगोलिक परिस्थिती, व्यवसायाचे स्वरूप लोकांना मिळणारा रोजगार व त्याच वेळेला येथील जमिनींचा आकार याचाही विचार करावा अशा स्पष्ट सूचना माननीय मंत्री महोदयांनी प्रशासनाला दिलेल्या आहेत. तात्पुरते परवाने द्यावेत त्याच वेळेला E pass ची सक्ती करू नये व त्याच वेळेला नवीन गटांना सहभाग घेऊन लवकरात लवकर मंजुरी द्यावी अशी सूचना व्यवसायिकांच्या हिताची केलेली आहे.
माननीय मंत्री महोदय श्री उदय जी सामंत यांचं नेहमीच खाण व्यवसायिकांना सहकार्य असतं आणि आज पुन्हा एकदा जिल्हास्तरावरील निर्माण झालेले प्रश्न अभ्यासपूर्ण विवेचन करून भौगोलिक परिस्थितीचा विचार करून सोडवलेले आहेत. जांभा चिरेखाण मालक असोसिएशन त्यांचे अत्यंत आभारी आहे.
सदर सभेला रत्नागिरी तालुक्याचे अध्यक्ष माननीय श्री बाबू म्हाप आणि रत्नागिरी चे सहकारी, राजापूर तालुका अध्यक्ष माननीय श्री सरफरे सेठ व राजापूर चे सहकारी, पावस विभागाचे अध्यक्ष श्री संदीप बने, आणि श्री मुनीर खान लांजा तालुका अध्यक्ष श्री हनिफ नाईक, या दोघांचे सहकारी, श्री भाई पवार श्री विनोद गोंधळेकर श्री बांद्रे शेठ दापोली त्याच वेळी संगमेश्वर तालुक्यातील अनेक खान व्यवसायिक उपस्थित होते.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री दादा डोंगरे यांनी सर्वांचे आभार मानले
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा