शब्द लहरी

 

      

 शब्द लहरी 

---------------------------
ज्ञानेश्वरीतील   सुंदर  प्रतिमाने


             आता  देई  अवधान।  प्रसंगे  तुज। सांगेन  ।  या  नैराश्येचे  चिन्ह  ।
धनुर्धरा  ।।

         तो  कामनामात्रे  न  घेणे  । मोहमळे
न  लिंपे  ।  जैसे  जळी  जळे  न  शिंपे ।
पद्मपत्र ।।

           तैसा  संसर्गामाजी  असे ।  राकळासारिका  दिसे । जैसे  तोयसंगे
आभासे  ।  भानुबिंब  ।।


       आता  अर्जुना  ! प्रसंगप्राप्त  अशी  
तुला  खऱ्या  निरिच्छ  मनुष्याची  लक्षणे
सांगतो.  ती  लक्ष  देऊन  ऐक.

        तो  कोणत्याही  वासनेने  आकळला
जात  नाही  व  त्याचे  मन  अविवेकरूपी
मलाने  मलीन  होत  नाही . कमळाचे  पान  जसे  रात्रंदिवस  पाण्यात  असूनही
पाण्याने  भिजत  नाही .

        त्या प्रमाणे  इतरांसारखा  बाह्यतः
संसारात  असूनही  तो  इतर  जनांसारखाच  दिसतो. ( आतून  अलिप्त
असतो. )  ज्या  प्रमाणे  पाण्याच्या
संगतीने  सूर्य बिंब  पाण्याहून  अलिप्त
असूनही  त्याचे  प्रतिबिंब  मात्र  पाण्यात
दिसते. 


सौ.  शैलजा  जाधव (पाटील)
           चांदवड   नासिक
-----------------------------------
  विचारधारा

कोणतीही व्यक्ती आपल्या सोबत निस्वार्थ भावना व अतूट विश्वास ठेवून जुळून असेल....तर त्याचे मन दुखावेल असे कोणतेही शब्द किंवा काम  चूकीने सुद्धा करू नका. जीवनामध्ये बऱ्याच वस्तू विकत घेता येते. पण, नि:स्वार्थ भावना ठेवून जगणारे तसेच विश्वासू व्यक्ती एकदा जर...का निघून गेले तर...परत कधी सापडत नाही. 

सौ. संगीता संतोष ठलाल
मु. कुरखेडा जि. गडचिरोली
----------------------------------------------------------------------
   निसर्ग

सुपीक जमीनीवर झाडांची लागवड न केल्याने त्या जमिनीचे वाळवंटात रुपांतर होत आहे. दररोज झाडे तोडल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत आहे आणि हवामान, नैसर्गिक आपत्ती इत्यादींच्या अनिश्चिततेचा मानवी जीवनावर खोलवर परिणाम होत आहे. पूर, त्सुनामी, दुष्काळ, भूस्खलन, उपासमार इत्यादी नैसर्गिक आपत्तींमुळे प्राण्यांचे जीव धोक्यात आले आहे आणि झाडे नष्ट झाल्याने मानवासोबत वन्यजीवांचेही जीव धोक्यात आले आहेत.

सौ.प्रतिमा अरुण काळे
निगडी प्राधिकरण पुणे,४४

टिप्पण्या