कवच कुंडल अभियानात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग !

 




कवच कुंडल अभियानात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग !

 भालूर येथे कवच कुंडल अभियानांतर्गत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत लसीकरणाचा उच्चांक केला.

सकाळी १० वाजता लसिकरणाला सुरुवात झाल्यानंतर नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली त्यामुळे दिवसभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण पूर्ण झाले. भालूर येथे ८०० नागरिकांना लसीकरण करण्यात आले तर लोहशिंगवे येथे २०० नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांगेत नोंदणी करण्यात येत होती. त्यामुळे कोणताही गोंधळ न होता लसीकरण पूर्ण झाले. ग्रामपंचायतीने गावात प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात केल्याने आणि गावातील सुशिक्षित तरुणांनी नोंदणी करण्यासाठी स्वयंस्फुर्तीने मदत केल्याने दिवसभरात ८०० चा आकडा पार करण्यात यश आले. यावेळी सरपंच अर्चना निकम, दिगंबर निकम, नंदू ईल्हे, आप्पासाहेब मडके, सौरभ निकम आदींसह नागरिक उपस्थित होते. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.विनया बोरसे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.प्रसाद आहेर, विशाल वाघ, स्मिता सानप, रेणुका कुंदे, जयश्री सुर्वे आदींसह आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या

news.mangocity.org