केंद्राला ७,५१५ कोटींचे लाभांश उत्पन्न

 

केंद्राला ७,५१५ कोटींचे लाभांश उत्पन्न

नवी दिल्ली : कररूपी महसुलात अपेक्षेपेक्षा सरस वाढ सुस्पष्टपणे दिसत असताना, केंद्राच्या करोत्तर महसुलातही चालू आर्थिक वर्षांत मोठी भर अपेक्षित आहे. मुख्यत: सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडून लाभांशरूपाने चालू वर्षांत आजपावेतो ७,५१५ कोटी रुपयांचे, तर निर्गुतवणुकीमार्फत ९,११० कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील एनटीपीसी आणि पीजीसीआयएल या कंपन्यांनी भारत सरकारला चालू आर्थिक वर्षांतील लाभांशापोटी अनुक्रमे १,५६० कोटी रुपये आणि १,०३३ कोटी रुपये प्रदान केले, अशा आशयाचे ट्वीट अर्थमंत्रालयातील ‘दिपम’ विभागाचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी सोमवारी केले. आधीच्या आठवडय़ात कोल इंडिया आणि ओएनजीसी या दोन बडय़ा सरकारी कंपन्यांनी लाभांशरूपाने अनुक्रमे १,४२६ कोटी रुपये आणि १,४०६ कोटी रुपये असे एकूण २,८३२ कोटी रुपये सरकारला दिल्याचे पांडे यांनी माहिती दिली होती. दिपम विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध तपशिलानुसार, आर्थिक वर्षांत आजपर्यंत सावर्जनिक उपक्रमांकडून सरकारने मिळविलेल्या लाभांशाची रक्कम ही ७,५१५ कोटी रुपये आहे. याव्यतिरिक्त  सार्वजनिक उपक्रमांतील सरकारी भागभांडवलाची विक्री करून अर्थात निर्गुतवणुकीतून ९,११० कोटी रुपयांचा महसूल आला आहे. तोटय़ातील सरकारी हवाई सेवा ‘एअर इंडिया’च्या टाटा सन्सला विक्री पाठोपाठ बीपीसीएलमधील १०० टक्के सरकारी हिश्शाची विक्रीची प्रक्रियाही अंतिम टप्प्यांत आहे.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या

news.mangocity.org