माहेर संस्थेने घडवली आई व मुलाची भेट
माहेर संस्थेने घडवली आई व मुलाची भेट
हातखंबा येथील निराधारांचा आधार ठरलेल्या माहेर या संस्थेमध्ये अनाथ, निराधार, रस्त्यावर फिरणारे, भरकटलेले मनोरुग्ण, नातेवाईक नसणारे, सिविल हॉस्पिटल, पोलीस ठाणे येथून पाठविलेले महिला-पुरुष दाखल होत असतात. जानेवारी 2021 मध्ये रेल्वे पोलीस यांना रेल्वे स्टेशन रत्नागिरी येथे वय वर्ष पन्नास असलेली एक निराधार व मानसिक रुग्ण महिला आढळली होती. ती आपले नाव बिजराणी पासी, उत्तर प्रदेश असे सांगत होती. रेल्वे पोलिसांनी तिच्या नातेवाईकांचा मोबाईल नंबर मिळवला होता. परंतु त्यावर प्रतिसाद येत नव्हता. अशा वेळेस तिला नातेवाईक येईपर्यंत माहेर संस्था हातखंबा येथे दाखल केले होते. माहेर संस्थेत तिच्यावर योग्य ते औषध उपचार झाले. घरचे वातावरण लाभल्याने बिजरानी पासी हिच्या मानसिक स्थितीत सुधारणा झाली. तिने आपले पूर्ण नाव,गाव व कुटुंबाची माहिती माहेर संस्थेचे अधीक्षक, सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांना दिली. इंटरनेटचा वापर करीत उत्तर प्रदेशातील कानपूर जवळील उदतपूर या गावातील बिजराणी पासी असल्याचे लक्षात आले. तिच्या पती व मुलाचा मोबाईल नंबर मिळवला व त्यांना संपर्क करून बिजराणी रोजद पासी ही माहेर संस्था रत्नागिरी ते असल्याचे कळविले. परंतु लॉकडाऊन व खूप पाऊस असल्याने उत्तर प्रदेश वरून नातेवाईकांना रत्नागिरीत येणे लवकर शक्य झाले नाही. मध्यंतरी बिजराणी कुटुंबाशी फोनवर संपर्क ठेवून होती व नातेवाईकाशी बोलणे होत असल्याने आनंदी होती. शेवटी तिचा दोन नंबरचा मुलगा दीपक वर्मा पासी हा नऊ महिन्यांनी माहेर संस्था रत्नागिरी येथे आईला घरी घेऊन जाण्यासाठी आला व एका वर्षाने आईला पाहून गहिवरला. बिजराणी हिला पती व सहा मुले आहेत तिची मानसिक स्थिती थोडी बिघडली असल्याने ती भावाकडे जातो म्हणून घरातून बाहेर पडली ते परत आलीच नाही.नातेवाईकानी खूप शोधले परंतु ती सापडली नव्हती. अशीच भरकटत ती रत्नागिरीत आली होती. मुलाला पाहून बिजरानी ही आनंदून गेली. कागदपत्रांची शहानिशा करून बिजरणी पासी हिला तिचा मुलगा दीपक वर्मा पासी याचे सुखरूप कायमस्वरूपी ताब्यात देण्यात आले. एका वर्षाने आई व मुलाची भेट माहेर संस्थेने घडवून आणल्याने संस्थेतील सर्वांच्या चेहर्यावर समाधान उमटले.
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा