खासदार राऊत आणि आमदार भास्कर जाधव यांची झालेली भेट जिल्ह्यात राजकीय चर्चेचा विषय बनला

 


खासदार राऊत आणि आमदार भास्कर  जाधव यांची झालेली  भेट जिल्ह्यात राजकीय चर्चेचा विषय बनला

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांनी दिर्घकालावधीनंतर आमदार भास्कर जाधव यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.शिवसेनेच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांसह आमदार जाधव आणि खासदार राऊत यांच्यात बंद खोलीमध्ये चाय पे चर्चा झाली. खासदार राऊत आणि आमदार जाधव यांची ही भेट जिल्ह्यात राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.आज सकाळी त्यांनी प्रथम आमदार भास्कर जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर जिल्हाप्रमुख सचिन कदम, विलास चाळके, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम, उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत हे मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते. बंद दाराआड तब्बल अर्धा तास या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या

news.mangocity.org