मंत्री पुत्राच्या त्या कथित कृत्याचा रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने तीव्र निषेध
रत्नागिरी
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाचे उत्तरप्रदेश मधील लखिमपूर येथील कथित कृत्य हे जनरल डायर व जलीयानवाला बाग मधील घटनेची आठवण करून देणारा आहे. शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारणाऱ्या मंत्री पुत्राच्या त्या कथित कृत्याचा रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत असल्याचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करण्याच्या बाता मारून, शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन केंद्रात सत्ता मिळाल्यावर शेठना शेतकऱ्यांचा विसर पडलेला दिसून येत आहे. इतर वेळी सोशल मीडियाद्वारे व्यक्त होणारे पंतप्रधान महोदय दिल्लीच्या सीमेवर आठशे शेतक-यांचा मृत्यू होऊन ही 'ब्र' काढत नाहीत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात आहे. लखिमपुर खेरी पासून शंभर किलमीटरवर उत्सव साजरा करायला वेळ आहे. मात्र पंतप्रधान महोदयांना पीडित कुटुंबाला भेटायला वेळ नाही? मृत शेतकऱ्यांविषयी संवेदना व्यक्त करू नये हे आपले भारतीयांचे दुर्दैव आहे.
केंद्रातील मंत्र्यांचा पुत्र घोर निंदनीय प्रकार करतो याचा अर्थ काय? खरं तर पंतप्रधान महोदयांनी मृत शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त करणे अपेक्षित होते व शेतकऱ्यांचे सांत्वन करायला हवे होते. परंतु तसे न करता भाजपवाले शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करीत असलेल्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी व खासदार राहुल गांधींवर टीका करत राहिले. काँग्रेस नेहमीच दिन-दुबळ्या व गोरगरीब जनतेच्या सुखा दुःखात सामील होऊन पीडितांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करीत आली आहे. या पुढेही काँग्रेस शेतकरी व गरीब जनतेसाठी काम करत राहील.
या विषयी सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेत भाजपला आरसा दाखवला आहे. लखीमपूर खेरी येथे शांततेने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडून टाकण्याचा आरोप भाजपचे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलावर असून त्याच्यावर गुन्हा नोदविण्यात आला आहे. मंत्री पुत्राच्या कृत्याचे पुरावे देखील समोर आले आहेत.
काँग्रेस वर टिका करण्याचा भाजपवाले व त्यांच्या भाडोत्री ट्रोलना नैतिक अधिकार नाही. पंतप्रधान महोदयांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा राजीनामा घेऊन त्यांच्या पुत्रास त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारीस शेकासन यांनी केली आहे.
महागाई वाढली असून भाव वाढीने सामान्य जनतेची कंबर मोडली आहे. केंद्र सकारकडून होणारी नागरिकांची पिळवणूक, पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरचे गगनाला भिडलेले भाव. शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष व लखीमपूर खिरी येथे भाजपचे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर गाड्या घालून शेतकऱ्यांना चिरडून टाकल्याच्या निषेधार्थ सोमवार दिनांक ११ ऑक्टबर २०२१रोजी महाविकास आघाडीच्या वतीने सर्व महाराष्ट्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदला रत्नागिरी वासियांनी देखील प्रतिसाद देऊन बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन हारिस शेकासन यांनी केले आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा