लोटे एमआयडीसी झोनचे डी झोनमध्ये रूपांतर करण्यासाठी समितीची बैठक घ्यावी लागेल -उद्योगमंत्री सुभाष देसाई
लोटे एमआयडीसी झोनचे डी झोनमध्ये रूपांतर करण्यासाठी समितीची बैठक घ्यावी लागेल -उद्योगमंत्री सुभाष देसाई
लोटे एमआयडीसी सुरू करताना त्याकाळातील समितीने या एमआयडीसीची सी झोनसाठी शिफारस केली होती. आता माझी किंवा तुमची इच्छा आहे, म्हणून सी झोनचे डी झोनमध्ये रूपांतर होणार नाही.या विषयासाठी मला समितीची बैठक घ्यावी लागेल. त्या समितीसमोर हा विषय ठेवावा लागेल. शक्य असेल तर यातून नक्की मार्ग काढू, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले.
लोटे एमआयडीसीचे डी झोनमध्ये रुपांतरित व्हावे, अशी मागणी येथील उद्योजकांनी देसाई यांच्याकडे केली होती. लोटे येथे हवा प्रदूषण निरीक्षण यंत्रणेच्या उद्घाटनप्रसंगी देसाई म्हणाले, ''माझी इच्छा आहे, म्हणून असे काही होणार नाही. झोनचे निर्णय घेणाऱ्या समितीसमोर त्यातून मार्ग काढू. तसेच हवा प्रदूषण निरीक्षण यंत्रणा महाराष्ट्रातील सर्व एमआयडीसीमध्ये बसविली जाईल.''
देसाई म्हणाले, ''लोटे येथे हवा प्रदूषण निरीक्षण व प्रदर्शन यंत्रणा बसवणे म्हणजे उद्योजकांनी स्वतःच्या कामाचे परीक्षण करण्यासारखे आहे. हे धाडसाचे पाऊल लोटेतील उद्योजकांनी उचलेले हे कौतुकाचे आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256


Comments
Post a Comment