राष्ट्रीय खो-खो स्पर्धा बारामतीला?

राष्ट्रीय खो-खो स्पर्धा बारामतीला?
महाराष्ट्रात खो-खो स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी राज्य शासनाशी संवाद साधणार आहेत,
डिसेंबर महिन्यात बारामती येथे पुरुष आणि महिलांच्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी उत्सुक असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पीवायसी हिंदू जिमखाना, पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी पवार यांनी उपस्थिती दर्शवली. लवकरच महाराष्ट्रात खो-खो स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी राज्य शासनाशी संवाद साधणार आहेत, असे पवार यांनी सांगितले. या सभेनंतर अर्जुन पुरस्कार विजेती खो-खोपटू सारिका काळे आणि प्रशिक्षक चंद्रजीत जाधव यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय भुवनेश्वरला झालेल्या कुमार-कुमारी गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या दोन्ही संघांतील खेळाडूंसह प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांना प्रत्येकी २१ हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरवण्यात आले.
सारिकाकडून संघटनेला एक लाखाची देणगी सत्कार सोहळ्यादरम्यान सारिकाने महाराष्ट्र खो-खो संघटनेला एक लाख रुपयांची देणगी दिली. सारिकाच्या कारकीर्दीवर लवकरच चित्रपट प्रदर्शित होणार असून याद्वारे मिळणाऱ्या निधीद्वारे ती गरीब आणि होतकरू खो-खोपटूंच्या विकासासाठी आर्थिक मदत करणार आहे.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा