सीमेवरील संघर्ष कायम ; भारत-चीन चर्चा निष्फळ; जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत पाच जवान शहीद

सीमेवरील संघर्ष कायम ; भारत-चीन चर्चा निष्फळ; जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत पाच जवान शहीद
दोन दहशतवादी ठार
नवी दिल्ली/जम्मू : भारतापुढील सीमासुरक्षेचे दुहेरी आव्हान पुन्हा अधोरेखित झाले. पूर्व लडाखमधील सीमासंघर्षांबाबत भारत-चीन यांच्यातील लष्करस्तरीय चच्रेची तेरावी फेरी निष्फळ ठरली. दुसरीकडे, जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्य़ात सोमवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या एका कनिष्ठ अधिकाऱ्यासह पाच जवान शहीद झाले. अनंतनाग आणि बंदिपोरा जिल्ह्यातील दोन चकमकींमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले.
पूर्व लडाखमधील सीमासंघर्षांचा तिढा रविवारी भारत-चीन यांच्यातील चर्चेच्या तेराव्या फेरीतही सुटू शकला नाही. पूर्व लडाख सीमेबाबत चीनने आडमुठी भूमिका कायम ठेवली. त्यातच जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हत्यासत्र घडविणाऱ्या दहशतवाद्यांशी सुरक्षा दलांच्या सोमवारी तीन ठिकाणी चकमकी झाल्या.
पूँछ येथील सूरनकोटमधील डेरा की गली (डीकेजी) नजीक असलेल्या एका खेडय़ात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने तेथे शोधमोहीम राबवली. या वेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी शोधपथकांवर बेछूट गोळीबार केला. त्यात एक कनिष्ठ अधिकारी (जेसीओ) आणि अन्य चार जवान जखमी झाले. लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती संरक्षण खात्याचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंदर आनंद यांनी दिली.
काही शस्त्रसज्ज दहशतवादी सीमेपलीकडून नियंत्रण रेषा ओलांडून भारतात घुसले असून, ते चामरेर जंगलात लपून बसले आहेत, अशी माहिती लष्कराला मिळाल्यानंतर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. परंतु जवानांशी चकमक उडाल्यानंतर दहशतवादी नजीकच्या राजौरी जिल्ह्य़ातील भंगाई खेडय़ात पळून गेले. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून त्या भागात मोठय़ा प्रमाणावर कुमक पाठवण्यात आल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. यापूर्वीच्या मोहिमांमध्येही तीन जवानांनी प्राण गमावले होते.
दरम्यान, जम्मू भागातील राजौरी आणि पूँछ या जोड-जिल्ह्य़ांमध्ये गेल्या जूनपासून घुसखोरीच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत चकमकींत नऊ दहशतवादी मारले गेले आहेत.
जवानांची नावे : नायब सुभेदार जसविंदर सिंग, नाईक मनदीप सिंग व्हील, शिपाई गज्जन सिंग, शिपाई सूरजसिंग आणि शिपाई वैसाख एच. हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256

Comments
Post a Comment