सेंद्रिय शेती पद्धतीचे महत्त्व सांगणारा कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाचा भव्य ऑनलाईन शेतकरी मेळावा संपन्न
रत्नागिरी प्रतिनिधी:-
ग्रामीण कृषी कार्यक्रमांतर्गत दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या मान्याताप्राप्त कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषी कन्यांमार्फत भव्य ऑनलाइन शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून कृषी सहय्यीका श्रीमती श्रुती कविटकर यांनी सेंद्रिय शेती बद्दल आणि त्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग मोहिते यांनी देखील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामुळे महाविद्यालयाचे प्राध्यापक राहुल गोंधळी, डॉ. सुनंदा गावित, श्रीमती रुपाली ढोले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अधिकारी प्रा.श्वेता मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चतुर्थ वर्ष कृषी पदवीच्या विद्यार्थिनी सायली सातोसे, सिद्धी गावडे, क्षमा ठाकरे, शिवाजी बुगडे यांनी सदरचा कार्यक्रम आयोजीत केला होता.
....................................
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते !
24x7
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा